Share Market: 2 जानेवारीला शेअर बाजारात ‘डी-डे’; स्टॉकमध्ये रातोरात होणार मोठा बदल, गुंतवणुकदारांसाठी निर्णायक दिवस
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Share Market: MCX च्या स्टॉकमध्ये 2 जानेवारीपासून मोठा उलथापालथ होणार असून, गुंतवणूकदारांचे लक्ष या ‘डी-डे’कडे लागले आहे.1 शेअरचे 5 शेअर्स होणार असल्याने हा निर्णय संधी ठरणार की फक्त आकड्यांचा खेळ, यावर बाजारात जोरदार चर्चा सुरू आहे.
मुंबई: देशातील तिसऱ्या क्रमांकाचा मोठा एक्सचेंज असलेल्या मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया (MCX) ने आपल्या शेअर्सच्या स्टॉक स्प्लिटसाठी रेकॉर्ड डेट जाहीर केली आहे. एमसीएक्सने स्पष्ट केले आहे की 2 जानेवारी रोजी कंपनीचा एक शेअर पाच शेअर्समध्ये विभागला जाईल, म्हणजेच 1:5 या प्रमाणात स्टॉक स्प्लिट होणार आहे. 2 जानेवारीपूर्वी ज्यांनी एमसीएक्सचे शेअर्स खरेदी केले असतील, त्यांनाच पात्रतेच्या आधारे या स्टॉक स्प्लिटचा लाभ मिळणार आहे. मात्र या स्टॉक स्प्लिट नेमका गुंतवणूकदारांसाठी काय फायदा होतो याबाबत अनेकांच्या मनात गोंधळ असतो.
advertisement
एमसीएक्सने जाहीर केले आहे की 2 जानेवारी रोजी स्टॉक स्प्लिटसाठी रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे. याच दिवशी कंपनी ठरवेल की कोणते गुंतवणूकदार या शेअर विभाजनासाठी पात्र आहेत. 18 डिसेंबर रोजी एमसीएक्सचा शेअर सकाळी 10,006.45 रुपये प्रति शेअर या दराने उघडला होता. याआधीच 17 डिसेंबर रोजी कंपनीने आपल्या अधिकृत फाइलिंगमध्ये स्पष्ट केले होते की 2 जानेवारी ही स्टॉक स्प्लिटसाठी रेकॉर्ड डेट म्हणून वापरण्यात येणार आहे.
advertisement
सप्टेंबर महिन्यातच कंपनीने जाहीर केले होते की एमसीएक्सच्या शेअरहोल्डर्सनी शेअर विभाजनाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या निर्णयानुसार, कंपनीचा प्रत्येक शेअर पाच भागांमध्ये विभागला जाणार आहे. सध्या एमसीएक्सच्या शेअरची फेस व्हॅल्यू 10 रुपये आहे, जी स्टॉक स्प्लिटनंतर 2 रुपये प्रति शेअर इतकी होईल.
advertisement
गुंतवणूकदारांसाठी स्टॉक स्प्लिटचा नेमका अर्थ काय?
उदाहरणार्थ: एखाद्या गुंतवणूकदाराकडे एमसीएक्सचे 10 शेअर्स असतील आणि प्रत्येक शेअरची किंमत 100 रुपये असेल, तर स्टॉक स्प्लिटनंतर त्या गुंतवणूकदाराकडे 50 शेअर्स असतील. मात्र त्या वेळी प्रत्येक शेअरची किंमत 100 रुपयांऐवजी फक्त 20 रुपये राहील. म्हणजेच स्टॉक स्प्लिटनंतर शेअर्सची संख्या पाचपट वाढेल, पण प्रति शेअर किंमत तितकीच प्रमाणात कमी होईल.
advertisement
या उदाहरणात स्टॉक स्प्लिटच्या आधी आणि नंतर गुंतवणूकदाराच्या एकूण गुंतवणुकीचे मूल्य बदलत नाही. आधी जसे एकूण मूल्य 1,000 रुपये होते, तसेच स्प्लिटनंतरही ते 1,000 रुपयेच राहते. फरक इतकाच असतो की शेअर्सची संख्या वाढते आणि प्रति शेअर किंमत कमी होते.
advertisement
गुंतवणूकदारांसाठी पोर्टफोलिओ तयार करणे होणार सोपे
स्टॉक स्प्लिटनंतर गुंतवणूकदारांसाठी आपला पोर्टफोलिओ तयार करणे अधिक सोपे होते. कारण कमी किमतीत कंपनीचे शेअर्स उपलब्ध होतात. ज्यामुळे लहान गुंतवणूकदारांनाही त्या शेअरमध्ये गुंतवणूक करणे शक्य होते. मात्र या प्रक्रियेचा कंपनीच्या मार्केट कॅपिटलायझेशनवर कोणताही परिणाम होत नाही.
advertisement
शेअरच्या कामगिरीबाबत बोलायचे झाल्यास, गेल्या एका महिन्यात एमसीएक्सच्या शेअरमध्ये सुमारे 3 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. गेल्या सहा महिन्यांत या शेअरने तब्बल 25 टक्क्यांचा परतावा दिला आहे. विशेष म्हणजे, 2025 या वर्षातच एमसीएक्सच्या शेअर्समध्ये सुमारे 58 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. सध्या कंपनीचे एकूण मार्केट कॅप सुमारे 50,895 कोटी रुपयांच्या आसपास आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 18, 2025 11:20 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Share Market: 2 जानेवारीला शेअर बाजारात ‘डी-डे’; स्टॉकमध्ये रातोरात होणार मोठा बदल, गुंतवणुकदारांसाठी निर्णायक दिवस











