Thane: ठाण्यात क्लबमध्ये भीषण आग, लग्न सोहळ्यात घडला प्रकार, घटनास्थळाचा VIDEO

Last Updated:

ठाण्यातील घोडबंदर रोड परिसरात ही घटना घडली आहे. या परिसरात  ब्लू रुफ नावाचा क्लब आहे. या क्लबमध्ये गुरुवारी एक लग्न सोहळा पार पडत होता. पण

News18
News18
प्रेम मोरे, प्रतिनिधी
ठाणे: ठाण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. घोडबंदर परिसरात एक क्लबमध्ये भीषण आग लागली आहे. लग्न समारंभामध्ये फायर वर्कचं काम सुरू असताना आग लागली असं सांगण्यात येत आहे. या आगीत काही जण अडकल्याची भीती वर्तवली जात आहे. घटनास्थळी आग विझवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,  ठाण्यातील घोडबंदर रोड परिसरात ही घटना घडली आहे. या परिसरात  ब्लू रुफ नावाचा क्लब आहे. या क्लबमध्ये गुरुवारी एक लग्न सोहळा पार पडत होता. पण, लग्न समारंभात फायर वर्क सुरू असताना अचानक स्फोट झाला आणि आग लागली. बघता बघता आग सर्वत्र पसरली. या आगीत काही जण अडकल्याची भीती वर्तवली जात आहे.
advertisement
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. आग कशामुळे लागली याचं कारण अद्याप समजू शकलं नाही. लग्न सोहळा सुरू असताना घडलेल्या घटनेमुळे सर्वत्र एकच गोंधळ उडाला आहे. आगीमध्ये किती लोक अडकले, याची माहिती अद्याप समोर आली नाही. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
advertisement
 विरारमध्ये घरातील गॅस गळती होऊन स्फोट
दरम्यान, मुंबईजवळील विरार पश्चिमेकडील पद्मावती नगरातील गोल्डन ओक इमारतीत गॅस गळती होऊन स्फोट झाल्याची घटना घडली आहे. घटनास्थळी वसई विरार शहर महानगरपालिकेचे अग्निशमन जवान पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवलं. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास हा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. गोल्डन ओक इमारतीच्या ए विंग 301 मध्ये हा स्पोट झाला असून यात आई आणि मुलगा गंभीर जखमी झाले आहेत.
view comments
मराठी बातम्या/ठाणे/
Thane: ठाण्यात क्लबमध्ये भीषण आग, लग्न सोहळ्यात घडला प्रकार, घटनास्थळाचा VIDEO
Next Article
advertisement
Satej Patil : सतेज पाटलांना विरोधी पक्षनेते पद मिळू नये धडपड? प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन
प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन, सतेज पाटलांना विधान परिषदेत..
  • प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन, सतेज पाटलांना विधान परिषदेत..

  • प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन, सतेज पाटलांना विधान परिषदेत..

  • प्रज्ञा सातव यांना फोडण्यामागे भाजपचा विशेष प्लॅन, सतेज पाटलांना विधान परिषदेत..

View All
advertisement