J J Hospital: 6 लाखांची रोबोटिक शस्त्रक्रिया केली अगदी मोफत! जेजे रुग्णालयात ग्रामीण महिलेला मिळाला नवीन जन्म
- Published by:Vrushali Kedar
- local18
Last Updated:
J J Hospital: आपल्या देशातील वैद्यकीय क्षेत्राने अमूलाग्र प्रगती केली आहे. बदलत्या काळासोबत नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून रुग्णांवर उपचार केले जात आहेत.
मुंबई : भारतीय उपखंडामध्ये आपल्या देशातील वैद्यकीय क्षेत्राचं नेहमीच कौतुक केलं जात. आपल्या देशातील वैद्यकीय क्षेत्राने अमूलाग्र प्रगती केली आहे. बदलत्या काळासोबत नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून रुग्णांवर उपचार केले जात आहे. जेजे रुग्णालयात झालेल्या एका शस्त्रक्रियेने याची प्रचिती आली. जेजे रुग्णालयात रोबोच्या साहाय्याने लठ्ठपणावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. विशेष म्हणजे ही शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जेजे रुग्णालय हे मुंबईतील प्रसिद्ध आणि मोठं सार्वजनिक रुग्णालय आहे. याठिकाणी महाराष्ट्रासह इतर राज्यांतील देखील काही रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात. गेल्या आठवड्यात या रुग्णालयात ग्रामीण भागातील 118 किलो वजनाची एक 36 वर्षांची महिला आली होती. ही महिला लठ्ठपणावरील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल झाली. डॉक्टरांनी तिच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. या अशा पद्धतीची शस्त्रक्रिया करण्यासाठी खासगी रुग्णालयात 5 ते 6 लाख रुपयांचा खर्च येतो. मात्र, जेजेमध्ये मोफत शस्त्रक्रिया करण्यात आली.
advertisement
रोबोच्या साहाय्याने केलेल्या शस्त्रक्रियेनंतर संबंधित रुग्ण दोन तासांतच उठून बसली. डीन आणि सर्जन डॉ. अजय भंडारवार यांच्या नेतृत्वाखाली डॉ. गिरीश बक्षी, डॉ. अमोल वाघ, डॉ. काशिफ अन्सारी आणि डॉ. सुप्रिया भोंडवे, भूलतज्ज्ञ विभाग प्रमुख प्रा. डॉ. उषा बडोले, भरत शाह आणि डॉ. अश्विनी संडेज या सर्व डॉक्टरांनी एकत्र येऊन ही शस्त्रक्रिया पूर्ण केली.
advertisement
डॉ. अजय भंडारवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, शासकीय योजनांतून शस्त्रक्रियांचा खर्च करण्यात येणार आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ आणि सचिव धीरज कुमार यांच्या प्रयत्नांमुळे जेजे रुग्णालयामध्ये रोबोटिक शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात झाली आहे. सध्या युरोलॉजी विभागातील सर्जन्सनी देखील रोबोच्या सहाय्याने शस्त्रक्रिया करण्याचं प्रशिक्षण घेतलं जात आहे. त्यांनी आतापर्यंत रुग्णावर दोन शस्त्रक्रिया केल्या आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 14, 2025 10:57 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
J J Hospital: 6 लाखांची रोबोटिक शस्त्रक्रिया केली अगदी मोफत! जेजे रुग्णालयात ग्रामीण महिलेला मिळाला नवीन जन्म