Video: वजन कमी करण्यासाठी करा डान्स, पाहा कसा करतात म्युझिक योगा?
- Published by:News18 Marathi
Last Updated:
संगितावर डान्स करून वजन कमी होतंय. डान्सिंग योगा किंवा म्युझिक योगाचे फायदे इथं पाहा.
वर्धा, 26 ऑगस्ट: वजन कमी करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे उपाय करतात. वेगवेगळे व्यायाम आणि आहार घेतात. ज्यामध्ये आणखी एक भर पडली आहे ती म्युझिक योगाची. म्युझिक योगा म्हणजे इन्स्ट्रुमेंटल गाण्यांवर ठेका धरून संपूर्ण शरीराचा व्यायाम करणे. यामध्ये झुंबा या पद्धतीचाही वापर केला जातो. झुंबा पद्धतीतील काही स्टेप्स यात आपण करू शकतो. योगा हा हसत खेळत देखील केला जाऊ शकतो याचं हे एक उत्तम उदाहरण म्हणता येईल. वर्धा येथील म्युझिक योगा प्रशिक्षक निकिता बुरांडे याचे मोफत प्रशिक्षण देत आहेत. त्याला अनेकांना लाभही झाला आहे.
कसा होतो डान्स योगा चा फायदा?
डान्स योगा किंवा म्युझिक योगाचा शरीरासाठी चांगला फायदा होतो. प्रशिक्षक निकिता या डान्स योगाचा त्यांना स्वतःला झालेला फायदा देखील सांगतात. त्यामुळे मोठ्या संख्येने वर्धेकर वजन कमी करण्यासाठी पहाटे साडेपाच ते सात वाजेपर्यंत मोठया उत्साहात प्रात्यक्षिके करताना दिसून येत आहेत. डान्सिंग योगा किंवा म्युझिक योगाच्या माध्यमातून शरीराला फायदा होतो. योगा नृत्यामुळे थायरॉईड, ब्लड प्रेशर, वजन वाढलेले कमी करणे किंवा पॅरेलेसिस, हातपाय दुखणे अशा प्रकारच्या अनेक शारीरिक समस्यांवर आराम मिळतो, असे प्रशिक्षक बुरांडे सांगतात.
advertisement
महिलांसह पुरुष वर्गही होतोय सहभागी
योगाच्या माध्यमातून सर्वांनी शारीरिक आणि मानसिक रित्या स्वस्थ राहण्याची गरज आहे. त्यासाठी वर्ध्याच्या आयटीआय टेकडीच्या परिसरात म्युझिक योगा प्रशिक्षक निकिता बुरांडे या मार्गदर्शन करत आहेत. वर्धेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी बघायला मिळतोय. महिलांसह पुरुष वर्ग देखील वजन कमी करण्यासाठी म्युझिक योगासाठी हजेरी लावतोय. झुम्बा स्टेप्स करून वजन कमी करण्यासाठी प्रयत्न केले जातात. त्यामुळे हळूहळू वर्धेकरांची संख्या याठिकाणी वाढताना दिसते आहे.
advertisement
नागरिकांना झुंबा किंवा योगा नृत्य करण्याचे फायदे कळल्यानंतर अनेकजण या स्टेप्स करत आहेत. तसेच शरीरासाठी होणारे योगाचे फायदे समजून घेत आहे. जेणेकरून त्याचा फायदा हा आपल्या निरोगी आयुष्यासाठी मदतीचा ठरेल. त्यामुळे आपणही निरोगी आरोग्यासाठी हा डान्सिंग योगा नक्की ट्राय करू शकता.
view commentsLocation :
Wardha,Maharashtra
First Published :
August 26, 2023 2:00 PM IST

