शक्तीवर्धक गोळ्यांमुळे गेला जीव; या औषधांमुळे असते मृत्यूची भीती?
- Published by:News18 Marathi
Last Updated:
शक्तीवर्धक गोळ्यांच्या अतिसेवनामुळे तरुणाचा ऱ्हदयविकारानं मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली होती.
पुणे, 25 ऑगस्ट : लैंगिक क्षमता आणि सेक्सचा कालावधी वाढवण्यासाठी काही जण वेगवेगळ्या प्रकारची औषधं घेतात. या गोळ्यांच्या अतिसेवनामुळे तरुणाचा ऱ्हदयविकारानं मृत्यू झाल्याची घटना भंडाऱ्यात नुकतीच घडली होती. या पार्श्वभूमीवर या प्रकराच्या गोळ्यांच्या अतिसेवनामुळे काय परिणाम होतो? त्या घेताना काय खबरदारी घ्यावी याची माहिती पुण्यातले डॉक्टर रणजित निकम यांनी दिलीय.
'या शक्तीवर्धक गोळ्या रेक्टाईल डिसफंक्शन या आजारामध्ये दिल्या जातात. यामध्ये लैंगिक अवयवांमधील इरेक्शन कमी झाल्यानंतर त्या घेतल्या जातात. या गोळ्या घेतल्यानंतर त्यामधील रक्तप्रवाह वाढतो. या गोळ्यानंतर त्या अवयवांकडे जाणारा रक्त प्रवाह वाढतो तसाच इतर अवयांकडे जाणारा रक्तप्रवाहही वाढतो.
advertisement
हा रक्तप्रवाह वाढल्यानंतर अंधूक दिसणे, हार्टबिट्स वाढणे, कमी ऐकू येणे यासारखे प्रकार घडतात. त्याचबरोबर या गोळीचा ओव्हरडोस झाला तर त्यामध्ये हार्टअटॅक येण्याची शक्यता असते, असे डॉ. निकम यांनी सांगितलं.
गेल्या काही वर्षांत काही औषधांबाबत लोकांच्या मनात स धारणा तयार झाल्या आहेत. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ही औषधे थेट खरेदी केली जातात. त्याचा फायदा होण्याऐवजी नुकसान होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे कुठली ही गोळी घेताना डॉक्टरांच्या सल्याने घेतली गेली पाहिजे, असा सल्लाही निकम यांनी दिला.
advertisement
भंडाऱ्यात काय घडलं?
भंडाऱ्यात मैत्रिणीसोबत लॉजवर आलेल्या 27 वर्षांच्या तरुणाचा मृत्यू शक्तीवर्धक गोळ्याच्या अतिसेवनामुळे झाला. या घटनेतील मृत तरुण हा नागपूर जिल्ह्यातला होता. त्याची मैत्रिण गोंदिया जिल्ह्यातली होती. या दोघांची काही दिवसांपूर्वी ओळख झाली होती. त्या ओळखीचे प्रेमात रुपांतर झाले. त्यानंतर एकमेकांना भेटण्यासाठी ते भंडाऱ्यात आले होते.
advertisement
मैत्रिणीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी या तरुणाने एकाच वेळी 2 शक्तीवर्धक गोळ्या घेतल्या. गोळ्याचे अतिसेवन केल्यानं त्याचा रक्तदाब वाढला. त्यातचं त्याला ऱ्हदयविकाराचा झटका आला. मैत्रिणीने लॉजमधल्या कर्मचाऱ्यांच्या मदतीनं त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
August 25, 2023 10:06 AM IST

