मुलांमध्ये डिप्रेशन वाढतंय, जीवही जाऊ शकतो, पालकांनी मुलांशी नेमकं वागायचं कसं?

Last Updated:

लहान मुलंच नाही, तर तुम्हाला कोणीही डिप्रेशनमध्ये दिसलं तर अशा व्यक्तींना मानसिक आधार द्या, त्यांना ताबडतोब डॉक्टरांकडे घेऊन जा.

+
मानसोपचारतज्ज्ञ

मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मिराज कादरी यांचे मार्गदर्शन.

अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी 
छत्रपती संभाजीनगर : डिप्रेशन हा शब्द अगदी सहज वापरला जातो. मात्र डिप्रेशन हा अत्यंत गंभीर मानसिक आजार आहे. या आजाराचं गांभिर्य आता कुठे लोकांना कळू लागलंय. परंतु दुर्देव असं की, आता अगदी लहान मुलंही डिप्रेशनचे शिकार होतात. मोठं झाल्यावर ताण वाढतो, कामाचा व्याप वाढतो, अशात डिप्रेशन येऊच शकतं. परंतु खेळण्या-बागडण्याच्या वयात डिप्रेशन येऊ लागलं तर काही पाहायलाच नको.
advertisement
लहान मुलं म्हणजे काय, दिवसभर कार्टून्स, असं पूर्वी पालक म्हणायचे. सतत टीव्ही पाहणं अयोग्य होतंच, परंतु त्यापेक्षा नुकसानदायी आहे तो आजकाल लहान मुलांच्या हातात असणारा मोबाईल फोन. सतत गेम खेळल्यामुळे मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होतो. त्यात त्या गेम्समध्ये दिले जाणारे वेगवेगळे टास्क मुलांचं टेन्शन वाढवणारे असतात. परंतु मुलांचा ताण कमी करण्यासाठी नेमकं करावं तरी काय, याबाबत मार्गदर्शन केलं आहे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मिराज कादरी यांनी.
advertisement
आता बहुतांश घरांमध्ये आई-वडील दोघंही नोकरी करणारे असल्यामुळे मुलं सतत एकटी राहून एकतर खूप रागीट होतात किंवा खूप शांत, घाबरट होतात. शिवाय पूर्वीसारखे आजी-आजोबाही फार कमी घरांमध्ये असतात, जे नातवंडांना त्यांच्या अनुभवाच्या गोष्टी सांगू शकतील. त्यामुळे वाट्याला एकलकोंडेपणा आल्यानं मुलांचं मानसिक आरोग्य बिघडू लागतं. आता तर लहान मुलांच्या आत्महत्येची प्रकरणंही समोर येऊ लागली आहेत, जे अतिशय भयंकर आहे. म्हणूनच कितीही धावपळीचं आयुष्य असलं तरी पालकांनी मुलांना वेळ द्यायलाच हवा.
advertisement
डॉक्टरांनी सांगितलं, 'पालकांनी मुलांसोबत मैत्रीचं नातं निर्माण करावं. त्यांना कुठल्याही गोष्टीसाठी फोर्स करू नये. अनेक पालक परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून मुलांवर ओरडतात, मुलं जरा चुकली की आरडाओरडा करतात, मात्र असं करू नये. प्रत्येकवेळी मुलांना समजवून सांगण्याचा प्रयत्न करावा. चांगला अभ्यास केला तर पुढे काय काय चांगलं घडू शकतं हे त्यांना समजवून सांगणं आवश्यक आहे. जर पालक आणि मुलांमध्ये छान मैत्रीचं नातं असेल तर मुलं असं टोकाचं पाऊल उचलणार नाहीत. तसंच मुलांनीदेखील स्वत:ची काळजी घ्यायला हवी. ताण न घेता अभ्यास करायला हवा', असंही डॉक्टर म्हणाले.
advertisement
दरम्यान, लहान मुलंच नाही, तर तुम्हाला कोणीही डिप्रेशनमध्ये दिसलं तर अशा व्यक्तींना मानसिक आधार द्या, त्यांना ताबडतोब डॉक्टरांकडे घेऊन जा. त्यांना वेळीच योग्य उपचार मिळाल्यास आत्महत्येसारखं टोकाचं पाऊस कोणी उचलणार नाही, असं डॉक्टरांनी सांगितलं.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
मुलांमध्ये डिप्रेशन वाढतंय, जीवही जाऊ शकतो, पालकांनी मुलांशी नेमकं वागायचं कसं?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement