थंडीत चुकूनही स्वेटर घालून नका झोपू, आरोग्यासाठी जास्त खतरनाक! अनेक गंभीर समस्यांना द्यावं लागेल तोंड

Last Updated:

थंडीत गरम कपडे घालून झोपल्याने अनेक समस्या येतात. रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, ज्यामुळे रक्तदाब कमी होऊ शकतो. गरम कपड्यांमुळे शरीरात जास्त उष्णता निर्माण होते, ज्यामुळे अस्वस्थता आणि भीती जाणवते.

News18
News18
हिवाळ्यात थंडीतून वाचण्यासाठी आपण उबदार कपडे वापरतो. पण अनेकदा लोक या उबदार कपड्यांमध्ये झोपून जातात, ज्यामुळे काही त्रास उद्भवू शकतात. हिवाळ्यात रक्तवाहिन्या संकुचित होतात. त्यामुळे, उबदार कपडे आणि जाड अंथरुण घालून झोपल्यास शरीरात गरमी जास्त प्रमाणात धरली जाते, ज्यामुळे बेचैनी, तणाव आणि कमी रक्तदाब यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.

उबदार कपड्यांमुळे होणारे आरोग्याचे धोके

  • कमी रक्तदाब : हिवाळ्यात जास्त उबदार कपडे घातल्यास रक्तदाब कमी होण्याची शक्यता असते.
  • एलर्जी आणि खाज : उबदार कपडे आणि जाड अंथरुणामुळे त्वचेवर एलर्जी, खाज आणि काही वेळा इतर समस्यादेखील दिसू शकतात.
  • अतिरिक्त उष्णता : शरीरातील उष्णता जास्त झाल्याने मधुमेह आणि हृदयविकार असणाऱ्यांना धोका निर्माण होऊ शकतो. उष्णतेच्या अतिरेकामुळे रक्तातील सोडियमचे प्रमाण वाढू शकते, ज्यामुळे उच्च रक्तदाबची समस्या उद्भवू शकते.
advertisement

झोपताना कापसाचे कपडे वापरण्याचे फायदे

आरोग्याच्या दृष्टीने झोपताना कापसाचे कपडे वापरणे उत्तम. कारण...
  • आरामदायक तापमान : कापसाचे कपडे शरीराला नैसर्गिक आरामदायक तापमान राखून ठेवतात.
  • अतिरिक्त उष्णतेपासून बचाव : कापसामध्ये शरीरातील उष्णता जास्त प्रमाणात अडकत नाही, ज्यामुळे अतिगरम होण्याचा धोका कमी होतो.
  • त्वचेची काळजी : कापसामुळे त्वचा आरामात राहते आणि एलर्जी व खाज यांसारख्या समस्या टाळता येतात.
advertisement

तुमच्या आरोग्यासाठी काही टीपा

  • हिवाळ्यात झोपताना गरम आणि जाड कपड्यांऐवजी हलक्या, कापसाच्या कपड्यांचा वापर करा.
  • उबदार राहण्यासाठी फक्त हलकं अंथरुण वापरा, ज्यामुळे शरीरात गरमपणाचे संतुलन राखले जाईल.
  • मधुमेह किंवा हृदयविकार असणाऱ्यांनी विशेष खबरदारी घेतली पाहिजे कारण शरीरातील जास्त उष्णता या आजारांवर विपरीत परिणाम करू शकते.
सर्दीत थंडीतून बचाव करण्यासाठी उबदार कपडे आणि अंथरुण आवश्यक असले तरी, झोपताना जास्त उष्णता होणे आरोग्यास हानिकारक ठरू शकते. त्यामुळे झोपताना कापसाचे हलके कपडे वापरा आणि गरम कपड्यांचा अति उपयोग टाळा. या सोप्या बदलांमुळे आपण हिवाळ्यातही निरोगी आणि आरामदायक झोप घेऊ शकता.
advertisement
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
थंडीत चुकूनही स्वेटर घालून नका झोपू, आरोग्यासाठी जास्त खतरनाक! अनेक गंभीर समस्यांना द्यावं लागेल तोंड
Next Article
advertisement
Virar Rename as Dwarkadhish : ''अच्छा नाम नही है...'',विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची लाट
'अच्छा नाम नही है...',विरारचे नाव द्वारकाधीश? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची
  • विरारचं नाव ‘द्वारकाधीश’ करण्याचा प्रस्ताव चर्चेत

  • शहरात आणि सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली

  • या संभाव्य नामांतराला उत्तर भारतीय समाजातील काही घटकांचा पाठिंबा

View All
advertisement