Free Treatment : वडिलांचं निधन झालं, डॉक्टर मुलानं ठरवलं, दर एकादशीला करतोय खास सेवा, तुम्हीही म्हणाल हाच खरा वारकरी!

Last Updated:

समाजामध्ये अशी काही माणसं असतात ते सामाजिक दायित्व म्हणून मोफत सेवा पुरवतात. जालना जिल्ह्यातील डॉक्टर महेश खरात हे देखील मागील चार वर्षांपासून दर एकादशीला मोफत वैद्यकीय सेवा पुरवतात.

+
News18

News18

जालना : समाजामध्ये वेगवेगळे घटक आपल्याला सेवा देत असतात. शेतकरी किंवा कामगार देखील आपल्याला वेगवेगळ्या सेवा पुरवतात आणि सेवांच्या बदल्यामध्ये ते आपल्याकडून शुल्क आकारत असतात. मात्र समाजामध्ये अशी काही माणसं असतात ते सामाजिक दायित्व म्हणून मोफत सेवा पुरवतात. त्याला आपण सामाजिक कामचं म्हणतो. जालना जिल्ह्यातील रामनगर येथील डॉक्टर महेश खरात हे मागील चार वर्षांपासून दर एकादशीला मोफत वैद्यकीय सेवा पुरवतात.
डॉक्टर महेश खरात यांच्या वडिलांचे 23 मे 2019 मध्ये कोरोना काळामध्ये निधन झालं होतं. त्यांचे वडील हे वारकरी संप्रदायातील होते. वडिलांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्त डॉक्टरांनी असा संकल्प केला की या पुढील प्रत्येक एकादशीला दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांकडून एकही रुपया न घेता मोफत सेवा द्यायची. महेश खरात यांच्या पत्नी देखील वैद्यकीय अधिकारी असून त्या देखील या क्षेत्रात मोलाचे योगदान देत आहेत.
advertisement
दर एकादशीला सामान्य पेक्षा जास्त रुग्ण दवाखान्यात येतात. दवाखान्याची सर्वसामान्य ओपीडी ही 70 रुपये आहे. एकादशीच्या दिवशी साधारणपणे 30 ते 35 रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात. या सर्व रुग्णांवर मोफत उपचार केले जातात. रामनगर इथे असलेल्या अंबिका हॉस्पिटलमध्ये डॉक्टर महेश खरात सेवा पुरवतात. गरजू व्यक्तींनी एकादशीला दवाखान्यात उपचारासाठी यावे आणि या मोफत सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन देखील डॉ. महेश खरात यांनी केले आहे.
advertisement
समाजामध्ये अनेक जणांना सामाजिक दायित्व म्हणून समाज उपयोगी काम करण्याची इच्छा असते. या क्षेत्रात काम करणारे डॉक्टर, नर्सेस किंवा इतर लोक देखील या पद्धतीने संकल्प करून आपले सामाजिक दायित्व निभावू शकतात, असे महेश खरात यांनी लोकल 18 शी बोलताना सांगितले.
महेश खरात यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा सिंधी काळेगाव येथे झाले. सहावी ते दहावीपर्यंतचे शिक्षण शिवाजी हायस्कूल रामनगर येथे झाले. यानंतर महाविद्यालयीन शिक्षण जे.ई.एस. महाविद्यालय जालना येथे झाले. तर बी.ए.एम.एस.चे शिक्षण पुसद येथे झाले. त्यांच्या वडिलांनी त्यांना प्रत्येक अडचणीच्या काळात मदत केलीस, खंबीर पाठिंबा दिला. त्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ आपण ही समाज उपयोगी काम करत असल्याचे डॉक्टर महेश खरात यांनी सांगितले.
advertisement
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Free Treatment : वडिलांचं निधन झालं, डॉक्टर मुलानं ठरवलं, दर एकादशीला करतोय खास सेवा, तुम्हीही म्हणाल हाच खरा वारकरी!
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement