वारंवार चक्कर येत असेल व्हा सावध! डॉक्टरांनी दिला गंभीर सल्ला
- Published by:News18 Marathi
Last Updated:
बदलत्या जीवनशैलीमुळं सध्याच्या काळात विविध आजार डोकं वर काढत असतात. वारंवार चक्कर येत असेल तर हे पाहा..
बीड, 3 ऑक्टोबर: सध्याच्या काळात बदलत्या जीवनशैलीमुळं विविध आजार डोकं वर काढत असतात. सकस आहार आणि व्यायामाच्या अभावामुळं अनेकदा गंभीर आजारांनाही सामोरं जावं लागू शकतं. काही वेळा सतत गरगरल्यासारखं होणं, चक्कर येणं असे प्रकार होतात. दरवेळी वेगळे अर्थ काढत दुर्लक्ष केले जाते. मात्र, हा आजार व्हर्टिगो अटॅक सारखा गंभीरही असू शकतो. याबाबतच बीड येथील डॉ अनिल बारकुल यांनी माहिती दिली आहे.
काय आहे व्हर्टिगो आजार?
काही वेळा आपल्याला चक्कर येते किंवा गरगर फिरल्यासारखे वाटते. काही लोकांना कमी ऐकायला येते. असा त्रास होत असेल तर आपल्याला व्हर्टिगो आजार असू शकतो. व्हर्टिगो आजारामध्ये चक्कर येण्याची वेगवेगळी कारणं असतात. यामध्ये कानाचे आजार, डोळ्यांचे आजार, बीपी लो असणं, ब्रेन ट्युमर या कारणांमुळे अचानकच चक्कर येऊ शकते. कसलीही हालचाल न करता जाग्यावरच गरगरल्यासारखं होतं. अशा आजाराला व्हर्टिगो म्हटलं जातं, असं डॉ बारकुल सांगतात.
advertisement
व्हर्टिगो अटॅकची लक्षणं काय?
व्हर्टिगो अटॅकची वेगवेगळी लक्षणं आहेत. मागं पुढं ढकलल्यासारखं होणं, तोल गेल्यासारखं वाटणं, डोकेदुखी, डोळ्यांवर अंधारी आल्यासारखं वाटणं, गोलगोल फिरणं, अशी याची लक्षणं आहेत. यावर आपण वेळीच सावध होऊन डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. फिजिशियन अथवा न्यूरो सर्जनकडून योग्य उपचार करून घेतल्यास यावर मात करता येऊ शकते, असं डॉक्टर सांगतात.
advertisement
व्हर्टिगोचे प्रकार किती?
सेंट्रल आणि पेरीफेरल असे दोन प्रकार व्हर्टिगोचे आहेत. पेरीफेरल हे कानाच्या आजाराने होतात. सेंट्रल हे मेंदूच्या आजाराने होतात. मल्टीपल स्क्लेरोसिक्स यानेही चक्कर येऊ शकते. तिसरा प्रकार दोन्हीचा मिक्स असतो. पहिला आणि दुसरा मणका याचे आजार, मेंदूच्या आवरणाचा आजार, थायरॉईडचे आजार यामुळे हा होतो. सारखे सारखे फिरल्यासारखे होणे, झोपल्यावर पोझिशन बदलल्यावर चक्कर येणे, त्यानंतर काही सेकंदात ती पुन्हा जाणे अशी लक्षणे यात दिसतात.
advertisement
रोगनिदान कसं करावं?
व्हर्टिगोची काही लक्षणे दिसताच आपण तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्यांच्या सल्ल्यानुसारच ऑडीओग्राम डोळ्यांच्या बाहुल्यांची तपासणी ( निस्टॅग्मोग्राफी), एमआरआय, मेंदूची अँजिओग्राफी आदी उपयुक्त तपासण्या करून घ्याव्यात, असा सल्ला डॉक्टर देतात.
Location :
Bid,Bid,Maharashtra
First Published :
October 03, 2023 11:17 AM IST