Egg Benefits : गावरान की बॉयलर, कोणती अंडी खाणे तब्येतीसाठी चांगली? कशातून मिळत शरीराला जास्त प्रोटीन? Video

Last Updated:

अंडी ही आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर आहेत. अंड्यामध्ये भरपूर प्रथिने असतात, ज्यामुळे अंडी खाणाऱ्या व्यक्तीच्या शरीराला कधीही प्रथिनांची कमतरता जाणवत नाही.

+
News18

News18

छत्रपती संभाजीनगर : अंडी ही आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर आहेत. अंड्यामध्ये भरपूर प्रथिने असतात, ज्यामुळे अंडी खाणाऱ्या व्यक्तीच्या शरीराला कधीही प्रथिनांची कमतरता जाणवत नाही. पण बऱ्याचदा आपल्या मनात प्रश्न पडतो की नक्की कोणती अंडी खावीत. गावरान अंडी की बॉयलर अंडी? दोन्ही अंड्यांमध्ये नेमका फरक काय? कोणती अंडी खाणे तब्येतीसाठी चांगली आहेत? याबद्दलच आहार तज्ज्ञ जया गावंडे यांनी माहिती दिली आहे.
advertisement
अंडी खाणं हे चांगलं असतं पण तुम्ही गावरान अंडी खाल्ली तर तू जास्त चांगली असतात कारण की त्या अंड्यांमधून भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन, फायबर आणि सर्वच गोष्टी आपल्या शरीराला मिळत असतात. त्यासोबतच गावरान अंड्यामध्ये मोठ्या प्रमाणात विटामिन्स असतात. ओमेगा असतं आणि ते आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतं. गावरान अंड्यामध्ये फ्लेवर असतात. चव देखील चांगली असते. त्यामुळे जर तुम्हाला देशी अंडी मिळत असतील तर ते खात जावे.
advertisement
तसेच तुम्ही बॉयलर खाऊ शकता. त्यामध्ये देखील अनेक असं पोषक घटक असतात ते देखील आपल्या शरीरसाठी चांगले असतात. तुम्ही कुठल्याही प्रकारची जर अंडी जर खात असाल तर ती तुम्ही चांगल्या क्वालिटीची घ्यावीत. तसंच तुम्ही अंडी जी आहेत ती तुम्ही कुठल्याही फॉर्ममध्ये खाऊ शकतात. तुम्ही त्याच्यापासून वेगवेगळ्या प्रकारच्या डिश करून खाऊ शकता किंवा नुसतं बॉईल करून देखील अंडे तुम्ही खाऊ शकता. जर तुम्हाला दररोज अंडे खायचे असेल तर तुम्ही गावरान अंडी ही खावी कारण की बॉयलर अंड्या पेक्षा ती अंडी जास्त चांगली आहेत, असं आहार तज्ज्ञ जया गावंडे सांगतात.
advertisement
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Egg Benefits : गावरान की बॉयलर, कोणती अंडी खाणे तब्येतीसाठी चांगली? कशातून मिळत शरीराला जास्त प्रोटीन? Video
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement