Yoga day 2025 : 74 वर्षांचा तरुण, 25 वर्षांपासून नाही कोणताच आजार, सांगितली निरोगी जीवनाची गुरुकिल्ली, Video
- Reported by:Aishwarya Ramnath Taskar
- Published by:Mohan Najan
Last Updated:
योगाचे शरीराला अनेक फायदे आहेत. अँड. गोरख दंडवते हे 74 वर्षांचे आहेत. ते गेल्या 25 वर्षांपासून योगा करून निरोगी आयुष्य जगत आहेत.
अहिल्यानगर : योगाचे शरीराला अनेक फायदे आहेत. त्यामुळे अनेक जण दिवसाची सुरुवातही योगा करण्यापासून करतात. राहाता तालुक्यातील अँड. गोरख दंडवते हे 74 वर्षांचे आहेत. ते गेल्या 25 वर्षांपासून योगा करून निरोगी आयुष्य जगत आहेत. योगा करून काय फायदा होतो? योगा का केला पाहिजे? याबद्दल अधिक माहिती अँड. गोरख दंडवते यांनी दिली आहे.
गेल्या 25 वर्षांपासून योगा करून अँड. गोरख दंडवते निरोगी आयुष्य जगत आहेत. ते सांगतात, गेल्या 25 वर्षांपासून योगा करताना अनेक अनुभव आले. योगा केल्यामुळे शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य देखील स्वस्थ राहतं. मी 25 वर्षांपासून दररोज सकाळी योगा करतो. योगा केल्यामुळे पूर्ण दिवस हा उत्साही जातो.
advertisement
योगा केल्यामुळे आपला आपल्या शरीरावर ताबा असतो आणि शरीर निरोगी असलं तर पूर्ण दिवसही उत्साही जातो. दिवसभर काम करण्याची ताकद योगा केल्यामुळे मिळते. तसेच योगा केल्यामुळे नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचार येतात. तसेच योगा केल्याने लवचिकता वाढते, रक्तदाब नियंत्रणात राहतो, पचनक्रिया सुधारते, वजन नियंत्रणात राहते, तसेच ताण-तणाव कमी होतो, मानसिक शांतता मिळते. तसेच शरीराला आणि मनाला सकारात्मक ऊर्जा मिळते, त्यामुळे योगा हा गरजेचा आहे.
advertisement
योगा केल्यामुळे कोणतेही काम करताना ते मनापासून आणि सकारात्मक विचार करून केलं जातं. तसेच योगा केल्यामुळे शारीरिक संतुलन टिकून राहतं आणि मन देखील प्रसन्न राहतं, असे यावेळी बोलताना अँड. गोरख दंडवते यांनी सांगितले.
Location :
Ahmadnagar,Maharashtra
First Published :
Jun 20, 2025 8:38 PM IST
मराठी बातम्या/हेल्थ/
Yoga day 2025 : 74 वर्षांचा तरुण, 25 वर्षांपासून नाही कोणताच आजार, सांगितली निरोगी जीवनाची गुरुकिल्ली, Video








