Seeds : पोटासाठी सर्वोत्तम फायबरयुक्त आहार, बद्धकोष्ठतेचा त्रास होईल कमी
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
फायबर आतड्यांसाठी प्रीबायोटिक म्हणून देखील काम करतं. यामुळे आतड्यांमधील फायदेशीर, शरीराला उपयुक्त बॅक्टेरियांना पोषण मिळतं. चिया सीडस्, जवस, सब्जा या तीन बिया आतड्यांच्या स्वच्छतेसाठी आवश्यक आहेत. आतड्यांमधून विषारी पदार्थ काढून टाकणं, तसंच आतड्यांच्या हालचालींना मदत करु शकतात.
मुंबई : आतडी आणि पर्यायानं पचनसंस्था चांगली राहावी यासाठी फायबर म्हणजेच तंतुमयता खूप आवश्यक आहे. काही बिया यासाठी चांगला पर्याय ठरु शकतात. कारण बियांमधे फायबर, निरोगी चरबी आणि इतर अनेक आवश्यक पोषक तत्वं असतात, यामुळे पचन आणि आतड्यांच्या कार्याला चालना मिळते. आहारातील फायबर आतड्यांच्या हालचालींना चालना देते आणि यामुळे बद्धकोष्ठतेसारख्या समस्या कमी जाणवतात.
फायबर आतड्यांसाठी प्रीबायोटिक म्हणून देखील काम करतं. यामुळे आतड्यांमधील फायदेशीर, शरीराला उपयुक्त बॅक्टेरियांना पोषण मिळतं. चिया सीडस्, जवस, सब्जा या तीन बिया आतड्यांच्या स्वच्छतेसाठी आवश्यक आहेत. आतड्यांमधून विषारी पदार्थ काढून टाकणं, तसंच आतड्यांच्या हालचालींना मदत करु शकतात.
advertisement
चिया सीड्स
चिया सीड्समधे विरघळणारे फायबर असतात. या बिया भिजवल्यावर, बियाणांमुळे एक जेल तयार होतं. यामुळे शरीरात साखर कमी शोषली जाते. आतड्यांतील सूक्ष्मजीवांचं पोषण आणि आतडी स्वच्छ करण्यासाठी या बिया उपयुक्त आहेत. पण या बिया कोरड्या खाऊ नका. खाण्यापूर्वी किमान पंधरा-वीस मिनिटं भिजवा.
advertisement
जवस
जवसाच्या बियांमधे ओमेगा-3 आहे. पण या बिया बारीक करून खा. दळलेल्या जवसाच्या बिया सूज, संप्रेरक संतुलन आणि कोलेस्टेरॉल व्यवस्थापनात देखील मदत करतात. जवसाची चटणीही तब्येतीसाठी चांगली. जवस भाजून, त्यात थोडा लसूण घालून ही चटणी चांगली लागते.
सब्जा
सब्जा चिया बियांसारखे दिसतात पण थंड असतात. यातही चिया सीड्ससारखे विरघळणारे फायबर असतात. पचनासाठी आयुर्वेदिक औषधांमधे याचा वापर अनेकदा केला जातो.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 06, 2025 2:44 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Seeds : पोटासाठी सर्वोत्तम फायबरयुक्त आहार, बद्धकोष्ठतेचा त्रास होईल कमी