advertisement

Yoga: सलग 30 दिवस रोज सकाळी योगा केल्यास काय होईल? तुम्हालाही महिती नसतील हे चमत्कारी फायदे!

Last Updated:

Yoga for Health: योगामुळे आपल्या आयुष्यात विविध प्रकारचे सकारात्मक परिणाम होतात. 30 दिवस रोज सकाळी योगा केल्यास आश्चर्यकारक फायदे होतात, असं योगा एक्स्पर्ट सांगतात.

+
Yoga:

Yoga: सलग 30 दिवस रोज सकाळी योगा केल्यास काय होईल? तुम्हालाही महिती नसतील हे चमत्कारी फायदे!

निरंजन कामत, प्रतिनिधी
कोल्हापूर: योगा ही भारताला मिळालेली सर्वात मोठी देणगी आहे. गेल्या काही काळात भारतीय लोक यापासून दूर जात आहेत. पण धकाधकीचं जीवन आणि आरोग्याकडे दुर्लक्ष शरीरासाठी भारी पडू लागलं आहे. त्यामुळे आपण आपल्या मुळांशी पुन्हा एकदा जोडलं गेलं पाहिजे आणि योगाला जीवनशैलीचा एक अविभाज्य भाग बनवायला हवा. एकंदरीतच योगामुळे आपल्य आयुष्यात नेमका कोणता फरक पडतो? हे कोल्हापुरातील योगा एक्सपर्ट स्नेहा छाब्रिया यांनी लोकल18 शी बोलताना सांगितलं.
advertisement
योगामुळे आपल्या आयुष्यात विविध प्रकारचे सकारात्मक परिणाम होतात. शरीर, मन आणि आत्मा यांमध्ये समतोल साधण्याच्या प्रक्रियेला योग म्हणतात. हे केवळ शारीरिक व्यायाम नाही, तर मानसिक आणि आध्यात्मिक विकासाचे साधन आहे. योगाचे फायदे शारीरिक, मानसिक आणि आत्मिक पातळीवर दिसून येतात.
advertisement
शारीरिक पातळीवर फायदे काय?
शारीरिक पातळीवर योगामुळे शरीरातील लवचिकता, ताकद आणि संतुलन सुधारते. नियमित योगामुळे हाडांची मजबुती वाढते, स्नायू ताणून जातात आणि शरीरातील रक्ताभिसरण सुधारते. यामुळे शरीराच्या विविध अवयवांची कार्यक्षमता वाढते, आणि व्यक्तीला चांगली शारीरिक अवस्था प्राप्त होते. हृदयविकार, डायबिटीस, उच्च रक्तदाब इत्यादी अनेक आजारांवर योगाचा सकारात्मक परिणाम दिसून येतो. विशेषतः प्राणायामाच्या माध्यमातून श्वासावर नियंत्रण ठेवणे, शरीराला शुद्ध करते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.
advertisement
मानसिक पातळीवर योगाचे महत्त्व
आजकालच्या तणावपूर्ण जीवनात मानसिक स्वास्थ्य टिकवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. योगाचे आसन आणि प्राणायाम तंत्र ताण व चिंता कमी करण्यास मदत करतात. श्वासावर लक्ष केंद्रित करून आणि ध्यान साधून मानसिक शांती साधता येते. यामुळे चिंता, नैराश्य, आणि अस्वस्थतेवर नियंत्रण ठेवता येते. ध्यान आणि योगाच्या शारीरिक स्थितींमुळे मनाची एकाग्रता वाढते, आणि मानसिक स्पष्टता मिळवता येते. त्यामुळे व्यक्तीच्या आत्मविश्वासातही वृद्धी होते. योगाच्या मदतीने अनेक गंभीर आजारांवर उपचार करता येतात. योग केल्याने काही दिवसांतच शरीरातील एंडोर्फिनची पातळी वाढू लागते, स्नायू मजबूत होतात, मेटाबॉलिज्म आणि मानसिक आरोग्य सुधारते.
advertisement
आध्यात्मिक पातळीवर फायदे
योग आपल्याला आत्मज्ञानाची प्राप्ती करायला मदत करतो. साधना आणि ध्यानाच्या माध्यमातून व्यक्ती आपल्याच आतल्या अस्तित्वाशी जुळवून घेतो आणि आंतरिक शांती प्राप्त करतो. योगामुळे जीवनाचा उद्देश आणि दिशा स्पष्ट होतात. आत्मा आणि शरीर यांच्यातील संबंध अधिक दृढ होतो आणि व्यक्तीचा आध्यात्मिक अनुभव बळकट होतो. अनेक लोक योगामुळे आध्यात्मिक उन्नती साधतात आणि जीवनाला अधिक अर्थपूर्ण बनवतात, असं स्नेहा छाब्रिया सांगतात.
advertisement
योगामुळे सामाजिक जीवनावरही सकारात्मक परिणाम होतो. जो व्यक्ती स्वतःच्या शरीर आणि मनाशी जुळवलेला असतो, तो इतरांशी अधिक समजूतदार आणि सौम्य असतो. यामुळे त्याचे संबंध सुधारतात आणि सामाजिक जीवन अधिक समाधानकारक बनते.
सलग 30 दिवस योगा केल्यास..
योगासनांच्या नियमित सरावाने शरीर ताणण्यास मदत होते. तुम्हाला शरीरात लवचिकता हवी असेल, तर तुम्ही नियमितपणे योगाभ्यास करत राहणे महत्त्वाचे आहे. स्नायूंच्या हालचालीसाठी शरीरात हालचाल चालू असणे देखील आवश्यक आहे. संयम ठेऊन या योगाभ्यासासाठी थोडा वेळ काढला तर शरीरातील दिसणारे बदल आणि क्षमता पाहून तुम्हीही थक्क व्हाल, असंही स्नेहा छाब्रिया सांगतात.
view comments
मराठी बातम्या/हेल्थ/
Yoga: सलग 30 दिवस रोज सकाळी योगा केल्यास काय होईल? तुम्हालाही महिती नसतील हे चमत्कारी फायदे!
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement