Health Care: व्हाईट की ब्राउन, आरोग्यासाठी कोणती साखर चांगली, दोन्हीत फरक काय?

Last Updated:

Health Care: बाजारात पांढरी आणि ब्राउन अशा दोन प्रकारची साखर मिळते. आरोग्यासाठी दोन्हीपैकी कोणती साखर चांगली हे आहारतज्ज्ञांकडून जाणून घेऊ.

+
Health

Health Care: व्हाईट की ब्राउन, आरोग्यासाठी कुठली साखर चांगली, दोन्हीत फरक काय?

छत्रपती संभाजीनगर : आपल्यापैकी अनेकांच्या दिवसाची सुरुवात चहाने होत असते. चहामध्ये गोडवा येण्यासाठी आपण साखरेचा वापर करतो. पण सर्वसामान्यपणे व्हाईट शुगर म्हणजेच पांढरी साखर आपल्याकडे वापरली जाते. पण बाजारात दोन प्रकारच्या साखर विक्रीसाठी असतात. एक आपण नेहमी वापरतो ती पांढरी साखर आणि दुसरी म्हणजे ब्राऊन शुगर. सध्या शुगरचा धोका लक्षात घेऊन अनेकांना दोन्हीपैकी कुठली साखर आरोग्यास चांगली असा प्रश्न पडतो? याबाबतच छत्रपती संभाजीनगरमधील आहारतज्ज्ञ जया गावंडे यांनी माहिती दिलीये.
ब्राऊन शुगर एकाच प्रकारच्या केनपासून तयार केले जातात. ब्राऊन शुगरमध्ये मोलोसिस असल्यामुळे त्याचा रंग आणि थोडीशी चव बदलते. बाकी दोन्ही साखरेतील गुणधर्म सारखाच असतो. आपण कुठलीही साखर खाल्ली तरी त्यापासून आपल्या शरीरामध्ये ग्लुकोजच तयार होते. ब्राऊन शुगरमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये कॅल्शियम, लोह आणि पोटॅशियम असतात. थोड्याफार प्रमाणात मिनरल्स देखील असतात. पांढऱ्या साखरेत मात्र हे सर्व घटक नसतात. हे घटक ब्राऊन शुगरमध्ये असले तरी ते कमी प्रमाणातच असतात. त्यामुळे दोन्ही साखरेचा ग्लायसेमिक इंडेक्स सारखाच आहे.
advertisement
दोन्ही साखर खाल्ल्यानंतर ग्लुकोज तयार होण्याचं प्रमाण सारखंच आहे. कॅलरीज देखील सारख्याच आहेत. फक्त 19-20 चा फरक आहे. काही पदार्थांमध्ये आपण जर ब्राऊन शुगर वापरले तर थोडा फ्लेवर चेंज होतो. जसं की डार्क चॉकलेट किंवा ब्राउनीमध्ये त्याचा वापर केल्यास रंग आणि फ्लेवरचा थोडा फरक येतो. तरीही मधुमेह असणाऱ्यांनी दोन्ही प्रकारची साखर न खाणंच चांगलं आहे. तसेच साखरेच्या ऐवजी गूळ किंवा मधाचा वापर देखील करणं फायद्याचं ठरू शकतं, असं आहारतज्ज्ञ सांगतात.
मराठी बातम्या/हेल्थ/
Health Care: व्हाईट की ब्राउन, आरोग्यासाठी कोणती साखर चांगली, दोन्हीत फरक काय?
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement