Monsoon Skin Care Tips: पावसाळ्यात तेलकट त्वेचेचे टेन्शन सोडा, फॉलो करा सोप्या टिप्स, चमक राहील चांगली, Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
पावसाळा म्हटलं की सगळ्याच ठिकाणी दमट वातावरण होतं आणि यामुळे आपला जो चेहरा आहे तो मोठ्या प्रमाणात तेलकट होतो.
छत्रपती संभाजीनगर : पावसाळा सुरू आहे. पावसाळा म्हटलं की सगळ्याच ठिकाणी दमट वातावरण होतं आणि यामुळे आपला जो चेहरा आहे तो मोठ्या प्रमाणात तेलकट होतो. यामुळे आपल्या चेहऱ्यावरची नैसर्गिक चमक जातेच पण त्यासोबतच आपल्या चेहऱ्यावर मुरूम किंवा पिंपल्स येतात आणि हे चांगले दिसत नाही. तर या पावसामध्ये चेहरा तेलकट होणे किंवा आपली स्किन केअर कशी असावी, कुठल्या टिप्स फॉलो कराव्यात तर याविषयी माहिती पाहुयात.
सगळ्यात पहिली महत्त्वाची टिप्स म्हणजे की तुम्ही दिवसातून दोन ते तीन वेळा चेहरा धुवावा. चेहरा धुताना तो तुमच्या चेहऱ्याला जे फेस वॉश सूट होतं त्या फेस वॉशने तुम्ही चेहरा धुवावा आणि प्रत्येक वेळेस चेहरा धुताना तुम्ही तो थंड किंवा कोमट पाण्याने धुवावा. यासाठी गरम पाण्याचा वापर करू नये. यामुळे तुमचा चेहरा चांगला राहतो आणि याच्यावरचं तेल देखील कमी होतं आणि चेहऱ्यावरचं अतिरिक्त तेल आणि जी धूळ आहे ती देखील निघून जाते. त्यानंतर तुम्ही अल्कोहोल फ्री टोनर वापरावे.
advertisement
म्हणजेच तुमचा चेहरा यामुळे चांगला राहील आणि तसेच तुम्ही ऑइल बेस जे मॉइश्चरायझर असतात ते वापरावे. ऑइल बेस मॉइश्चरायझर तुम्ही वापरलं तर त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर अतिरिक्त तेल कमी व्हायला मदत होते. त्यानंतर तुम्ही जास्त चेहऱ्यावर तुमच्या तेल येत असेल तर तुम्ही ब्लोटिंग पेपरचा देखील वापर करू शकता. हे तुमच्या चेहऱ्यावरचे अतिरिक्त तेल शोषून घ्यायला मदत करतं. त्यानंतर तुम्ही होम रेमेडीज देखील वापरू शकता.
advertisement
तुम्ही घरच्या घरी फेस पॅक तयार करून तो लावू शकता. तुमच्या चेहऱ्याला जे सूट होतं ते स्क्रब तुम्ही दोन किंवा तीन वेळा वापरावं. तसंच एलोवेरा जेलचा वापर करावा. एलोवेरा जेल जर तुम्ही तुमच्या चेहऱ्याला लावलं तर यामुळे तुमच्या चेहऱ्यावरचे अतिरिक्त तेल आहे ते देखील यामुळे कमी होतं. या सर्व टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुमचा चेहरा हा ग्लो करेल आणि एकदम नैसर्गिक चमक ही राहील. तर या सगळ्या टिप्स तुम्ही यासाठी फॉलो करू शकता.
Location :
Aurangabad [Aurangabad],Aurangabad,Maharashtra
First Published :
July 22, 2025 5:36 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Monsoon Skin Care Tips: पावसाळ्यात तेलकट त्वेचेचे टेन्शन सोडा, फॉलो करा सोप्या टिप्स, चमक राहील चांगली, Video