Health Tips: पावसाळ्यात घरात पाणी शुद्ध करण्यासाठी क्लोरीन लिक्विड वापरणे चांगले की वाईट? सोप्पी पद्धत काय?

Last Updated:

पाणी थेट वापरल्यास पोटदुखी, उलट्या, जुलाब, हिवताप आणि टायफॉईड यांसारखे आजार होण्याचा धोका संभवतो. त्यामुळे पावसाळ्यात स्वच्छ आणि सुरक्षित पाणी वापरणे अत्यंत आवश्यक आहे

+
News18

News18

बीड: पावसाळ्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे विहिरी, तलाव, नदी किंवा नळाद्वारे मिळणाऱ्या पाण्यामध्ये माती, कचरा, आणि हानिकारक जंतूंचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढतं. हे पाणी थेट वापरल्यास पोटदुखी, उलट्या, जुलाब, हिवताप आणि टायफॉईड यांसारखे आजार होण्याचा धोका संभवतो. त्यामुळे पावसाळ्यात स्वच्छ आणि सुरक्षित पाणी वापरणे अत्यंत आवश्यक आहे, अशी माहिती बीड जिल्ह्यातील आरोग्य तज्ज्ञ विपुल काळे यांनी दिली.
पाणी शुद्ध करण्यासाठी सर्वप्रथम ते गाळणं गरजेचं आहे. स्वच्छ कापड, बारीक जाळीची चाळणी किंवा फिल्टर वापरून पाण्यातील घाण, माती आणि अन्य अशुद्धता वेगळी केली जाते. यानंतर पाणी उकळणं ही सोपी आणि परिणामकारक पद्धत मानली जाते. पाणी किमान 10 मिनिटे उकळल्यास त्यातील हानिकारक जंतू नष्ट होतात आणि पाणी पिण्यास योग्य होतं.
advertisement
घरांमध्ये आरो किंवा यूव्ही फिल्टर असल्यास त्यांचा वापर करावा. याशिवाय बाजारात मिळणाऱ्या क्लोरीन टॅब्लेट्स किंवा लिक्विड क्लोरीन वापरूनही पाणी निर्जंतुकीकरण करता येतं. मात्र अशा रसायनांचा वापर करताना डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. तसंच एक पारंपरिक पण परिणामकारक उपाय म्हणजे पारदर्शक बाटलीत भरलेलं पाणी 6 ते 8 तास सूर्यप्रकाशात ठेवणं. यामुळे सोलर डिसइन्फेक्शनद्वारे पाणी सुरक्षित होतं.
advertisement
फक्त पाणी शुद्ध करणं पुरेसं नाही तर पाणी साठवण्यासाठी वापरली जाणारी भांडी देखील रोज स्वच्छ केली पाहिजेत. झाकण असलेली भांडी वापरल्यास धूळ, डास आणि इतर घाण पाण्यात जाण्यापासून रोखता येते. विशेषतः घरात लहान मुले, वृद्ध किंवा रोगप्रवण व्यक्ती असतील, तर अधिक खबरदारी घेणं आवश्यक ठरतं.
पावसाळ्याच्या काळात स्वच्छ पाणी हेच आरोग्याचं मुख्य रक्षण आहे. त्यामुळे घराघरात पाणी शुद्धीकरणाच्या सोप्या पद्धती अंगीकारणं गरजेचं आहे. सरकारी आरोग्य विभाग आणि स्थानिक प्रशासनाने देखील या बाबत जनजागृती करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
view comments
मराठी बातम्या/हेल्थ/
Health Tips: पावसाळ्यात घरात पाणी शुद्ध करण्यासाठी क्लोरीन लिक्विड वापरणे चांगले की वाईट? सोप्पी पद्धत काय?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement