टीन यूझर्सच्या सेफ्टीसाठी नवा प्लॅन! आता ChatGPT लावेल वयाचा अंदाज, असं काम करेल फीचर
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
आता चॅटजीपीटीवर टीन सेफ्टी वाढवण्यासाठी ऐज प्रेडिक्शन सिस्टम सुरु केली गेली आहे. यामध्ये प्लॅटफॉर्म स्वतःच यूझरच्या वयाचा अंदाज लावेल.
मुंबई : आपल्या प्लॅटफॉर्मवर टीन यूझरच्या सेफ्टीला मजबूत करण्यासाठी ओपनएआयने चॅटजीपीटीवर ऐज प्रेडिक्शन सिस्टम सुरु केली आहे. ही सिस्टम वेगवेगळ्या सिग्नलच्या आधारे यूझरच्या वयाचा अंदाज लावेल. त्यांना वाटले की, एखाद्या यूझरला 18 वर्षांपेक्षा कमी वयाचा आहे तर ते अॅडिशनल सेफ्टी सेटिंग अप्लाय करेल. जेणेकरुन यूझरला वयाच्या हिशोबाने आणखी सेफ एक्सपीरियन्स मिळू शकेल. चला जाणून घेऊया, ही सिस्टम कशी काम करेल आणि चॅटजीपीटीला कसं कळेल की, एखाद्या यूझरचे वय किती आहे.
वय कसं कळेल?
चॅटजीपी म्हणते की, ते एक स्पेशल ऐज प्रेडिक्शन मॉडल वाबरेल. जे बिहेवियरल आणि अकाउंट-लेव्हल सिग्नलच्या कॉम्बिनेशनच्या आधारावर यूझरच्या वयाचा अंदाज लावेल. यामध्ये कंपनी पाहिल की, एखादं अकाउंट किती जास्त काळ चालत आहे. त्याचा अॅक्टिव्हिटी टाइम काय आहे, अकाउंटचा युजेज पॅटर्न काय आहे आणि साइन-अपच्या वेळी यूझरने आपले वय किती सांगितले होते. कंपनी म्हणते की, हे वेगवेगळ्या इंडीकेटर्सचा वापर करुन जाणून घेऊ शकते. एखादं अकाउंट मायनरचं असेल किंवा त्याचं वय 18 वर्षांच्या वय झालं असेल. रोल आउटनंतर यूझर फीडबॅकच्या आधारावर हे मॉडल रिफाइन होत राहील.
advertisement
वयाचा अचूक अंदाज लावला नसेल तर काय?
ओपनएआय म्हणते की, जर मॉडेल यूझरचे वय अचूकपणे ठरवू शकत नसेल, तर ते सुरक्षा सेटिंग अॅक्टिव्ह करेल. एखाद्या यूझरला असे वाटत असेल की सिस्टमने त्यांना चुकून 18 वर्षाखालील म्हणून ओळखले आहे, तर ते सेल्फी वापरून व्हेरिफिकेशन प्रोसेस पूर्ण करू शकतात.
advertisement
किशोरवयीन यूझर्सना असा कंटेंट दिसणार नाही
त्याचप्रमाणे, एखादा यूझर 18 वर्षांपेक्षा कमी वयाचा असेल, तर हा चॅटबॉट संवेदनशील आणि संभाव्य हानिकारक सामग्रीचा संपर्क कमी करेल. कंपनीने असे म्हटले आहे की ग्राफिक हिंसाचार, संभाव्य हानिकारक व्हायरल आव्हाने, लैंगिक, रोमँटिक किंवा हिंसक भूमिका-खेळ, अत्यंत सौंदर्य मानके, अस्वास्थ्यकर आहार आणि बॉडी शेमिंग असलेला कंटेंट 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या यूझर्ससाठी रेस्ट्रिक्ट असेल.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 22, 2026 7:36 PM IST
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
टीन यूझर्सच्या सेफ्टीसाठी नवा प्लॅन! आता ChatGPT लावेल वयाचा अंदाज, असं काम करेल फीचर









