Water Supply : मुंबईत पाणीबाणी, 24 तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद, कधी आणि कुठं?
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
या 24 तासांच्या कालावधीत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एस व टी विभागातील काही भागांमध्ये तसेच ठाणे शहरातील काही भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
मुंबई : मुलुंड (पश्चिम) येथील 2400 मिलीमीटर व्यासाच्या वैतरणा मुख्य जलवाहिनीवरील 12 जलजोडण्या या 2750 मिलीमीटर व्यासाच्या अप्पर वैतरणा मुख्य जलवाहिनीवर स्थलांतरित करण्याचे कामकाज हाती घेण्यात आले आहे. तसेच भांडुप (पश्चिम) येथील खिंडिपाडा परिसरातील 2400 मिलीमीटर व्यासाच्या वैतरणा जलवाहिनीस लोखंडी झाकण बसविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. स्थलांतरण आणि दुरुस्ती कार्यवाही मंगळवार, दिनांक 27 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजेपासून बुधवार, दिनांक 28 जानेवारी रोजी सकाळी 11.00 वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. या 24 तासांच्या कालावधीत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एस व टी विभागातील काही भागांमध्ये तसेच ठाणे शहरातील काही भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा. दुरुस्तीच्या कालावधीत काटकसरीने पाणी वापरावे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून पुढील काही दिवस पाणी उकळून गाळून प्यावे, महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
1. टी विभाग : अमर नगर, गरखाचाळ, जय शास्त्री नगर, पंचशील नगर, हनुमानपाडा, राहुल नगर, मुलुंड वसाहत, मलबार हिल मार्ग, स्वप्ननगरी, वीणा नगर, योगी हिल, मॉडेल टाऊन मार्ग, बी. आर. मार्ग, वैशालीनगर, घाटीपाडा व गुरुगोविंद सिंग मार्ग लगतचा परिसर मुलुंड पश्चिम नियमित पाणीपुरवठा साधारण 18 तास मंगळवार राहील. दिनांक 27 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजेपासून बुधवार, दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10.00 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
advertisement
2. टी विभाग : मुलुंड-गोरेगाव जोडरस्ता लगतचा परिसर (मुलुंड पश्चिम), लाल बहादूर शास्त्री मार्ग लगतचा परिसर (मुलुंड पश्चिम), जे. एन. मार्ग, देवी दयाल मार्ग, क्षेपणभूमी (डम्पिंग) मार्ग, डॉ. आर. पी. मार्ग, पी. के. मार्ग, झवेर मार्ग, महात्मा गांधी मार्ग, एन. एस. मार्ग, एस. एन. मार्ग, आर. एच. बी. मार्ग, वालजीलाढा मार्ग, व्ही. पी. मार्ग, मदनमोहन मालविय मार्ग, ए. सी. सी. मार्ग, बी. आर. मार्ग, गोशाळा मार्ग, एस. एल. मार्ग, नाहुरगाव नियमित पाणीपुरवठा 24 तास मंगळवार राहील. दिनांक 27 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजेपासून बुधवार, दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10.00 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
advertisement
3. एस विभाग : खिंडिपाडा अ) लोअर खिंडिपाडा, ब) अप्पर खिंडीपाडा नियमित पाणीपुरवठ्याची वेळ पहाटे 5.00 ते सायंकाळी 5.00 असेल. मंगळवार, दिनांक 27 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजेपासून बुधवार, दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10.00 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
4. ठाणे शहर विभाग : किसन नगर (पूर्व), किसन नगर (पश्चिम), भटवाडी नियमित पाणीपुरवठा 24 तास असेल. मंगळवार, दिनांक 27 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजेपासून बुधवार, दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10.00 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद असेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 22, 2026 7:17 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
Water Supply : मुंबईत पाणीबाणी, 24 तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद, कधी आणि कुठं?







