Hair Care : हिवाळ्यात केस तुटण्याची समस्या? वेळीच घ्या अशी काळजी, सोप्या टिप्सचा Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
हिवाळा सुरू आहे. आपण जशी आपली स्कीनची काळजी घेतो, तशीच आपल्या केसांची काळजी घेणे आवश्यक असते.
छत्रपती संभाजीनगर: हिवाळा सुरू आहे. आपण जशी आपली स्कीनची काळजी घेतो, तशीच आपल्या केसांची काळजी घेणे आवश्यक असते. कारण की हिवाळ्यात आपले केस हे मोठ्या प्रमाणात फ्रीझी होतात. मोठ्या प्रमाणात कोंडा देखील होतो, तर ह्या हिवाळ्यात आपले हेअर केअर रूटीन कसे असावे हे जाणून घेऊ.
हिवाळ्यात हवेमधील आर्द्रता मोठ्या प्रमाणात घटते. या वातावरणातील बदलाचा थेट परिणाम आपल्या टाळूवर होतो. या काळात टाळू कोरडी होण्याची गती वाढते आणि त्यातूनच कोंडा, खाज, खवले गळणे आणि केस तुटणे यांसारख्या समस्या निर्माण होतात. याशिवाय घरामध्ये वापरले जाणारे हिटर, गरम पाणी आणि वारंवार केलेले स्टाइलिंग या सर्वांमुळे केसांची ड्रायनेस आणि फ्रीझीनेस अजून वाढू शकतो.
advertisement
केसांसाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे मॉइश्चर राखणे. त्यामुळे हिवाळ्यात खूप शॅम्पू न करता फक्त आठवड्यातून दोन ते तीन वेळा शॅम्पू करणे योग्य. तसेच सल्फेट-फ्री आणि मॉइश्चरायझिंग शॅम्पूचा वापर करणे अधिक फायदेशीर ठरते. प्रत्येकवेळी शॅम्पूनंतर कंडिशनर लावणे आवश्यक आहे. गरम पाण्याचा वापरही कमी करायला हवा. अतिशय गरम पाणी टाळूतील नैसर्गिक तेल कमी करते, त्यामुळे केस कोरडे पडतात. केस धुताना हलके कोमट पाणीच वापरणे गरजेचे आहे.
advertisement
हिवाळ्यात तेल मालिश अत्यंत उपयुक्त ठरते. बदाम, नारळ, ऑलिव्ह किंवा कॅस्टर ऑइलने हलक्या हातांनी मालिश केल्यास टाळूला पोषण मिळते आणि कोंडा कमी होतो. आठवड्यातून दोनदा तेल लावणे उत्तम मानले जाते. त्याशिवाय एकदा तरी डीप कंडिशनिंग किंवा हेअर मास्कचा वापर करावा. दही, मेथी, अॅलोव्हेरा किंवा नारळ तेलासारख्या नैसर्गिक घटकांपासून तयार केलेले मास्क केसांना मऊपणा आणि चमक देतात.
advertisement
फ्रीझ कमी करण्यासाठी सीरमचा वापर करणेही आवश्यक आहे. अंघोळीनंतर टॉवेल ड्राय केसांवर थोडे सीरम लावल्यास केस लवकर गुंतत नाहीत आणि व्यवस्थित सेट राहतात. ड्रायर, स्ट्रेटनर किंवा स्टाइलिंगची जास्त गरज भासल्यास हीट प्रोटेक्शन स्प्रे नक्की वापरावा. मात्र शक्यतो नैसर्गिकरीत्या केस वाळू देणेच अधिक सुरक्षित आहे. कोंड्याची समस्या वाढल्यास लिंबू आणि नारळ तेलाचे मिश्रण, मेथीची पेस्ट किंवा टी-ट्री ऑइलचे काही थेंब शॅम्पूमध्ये मिसळून वापरल्यास चांगला परिणाम दिसू शकतो.
view commentsLocation :
Aurangabad [Aurangabad],Aurangabad,Maharashtra
First Published :
December 03, 2025 6:28 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Hair Care : हिवाळ्यात केस तुटण्याची समस्या? वेळीच घ्या अशी काळजी, सोप्या टिप्सचा Video

