थंडीच्या दिवसात तुम्ही ही चूक करता, होऊ शकतो गंभीर परिणाम, डॉक्टरांनी दिला मोलाचा सल्ला

Last Updated:

हिवाळ्यात थंडीचा जोर वाढताच त्वचेचे अनेक विकार डोकं वर काढायला सुरुवात करतात. त्वचा रखरखीत होणे, ओठ काळे होणे, ओठांना भेगा पडणे, केसांमध्ये कोंडा होणे या सामान्य समस्या हिवाळ्यामध्ये पाहायला मिळतात.

+
Skin

Skin care 

नारायण काळे, प्रतिनिधी 
जालना : सध्या हिवाळा सुरु आहे. हिवाळ्यात थंडीचा जोर वाढताच त्वचेचे अनेक विकार डोकं वर काढायला सुरुवात करतात. त्वचा रखरखीत होणे, ओठ काळे होणे, ओठांना भेगा पडणे, केसांमध्ये कोंडा होणे या सामान्य समस्या हिवाळ्यामध्ये पाहायला मिळतात. या समस्या टाळण्यासाठी काय करावे? याबद्दलच सौंदर्यतज्ज्ञ डॉ. अमृता कुलकर्णी यांनी माहिती दिली आहे.
advertisement
कशी घ्यावी केसांची काळजी? 
हिवाळ्यामध्ये थंडीचे प्रमाण वाढल्यामुळे बऱ्याच महिला केसांना आठ ते दहा दिवस धुवत नाहीत. परंतु थंडी असताना देखील आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा केसांना स्वच्छ धुणे गरजेचे आहे. यामुळे केसातील कोंडा नाहीसा होतो तसेच त्वचेचे आरोग्य उत्तम राहतं. त्याचबरोबर थंडीच्या दिवसांमध्ये आपण नेहमीप्रमाणे वापरत असलेला साबण वापरण्याऐवजी मॉइश्चरायझर असलेला साबण वापरणे कधीही योग्य. यामुळे त्वचा खराब होत नाही. त्वचेचा पीएच मेंटेन राहिल्याने त्वचेचे आरोग्य उत्तम राहतं.
advertisement
थंडीत ओठांचं आरोग्य जपणं गरजेचं
थंडी वाढताच ओठांचं आरोग्य जपणं देखील अत्यंत गरजेचं आहे. ओठांना भेगा पडणे, ओठ काळे होणे अशा सर्वसामान्य समस्या हिवाळ्यात पाहायला मिळतात. हे टाळण्यासाठी आपण एखाद्या लिपबामचा वापर करावा. ज्यामध्ये योग्य प्रमाणात मॉइश्चरायझर असेल किंवा घरी असलेल्या तुपाचा देखील वापर करू शकतो. त्याचबरोबर त्वचेचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी विटामिन ई असलेली फळे खावीत जसे की पपई, आवळा, ड्रायफ्रूटचा देखील आपल्या आहारात नियमित समावेश आपण करू शकतो. ज्यामध्ये अक्रोड, बदाम आणि ड्रायफ्रूट्सचे बनवलेले लाडू हे नियमितपणे खाल्ल्यास त्वचेचे आरोग्य उत्तम राखण्यास मदत होईल.
advertisement
थंडी वाढल्यानंतर आपल्याला कमी प्रमाणात तहान लागते. त्यामुळे पाणी पिण्याचे प्रमाण देखील मंदावते. मात्र तहान कमी असताना देखील प्रत्येक व्यक्तीने एक किलो वजनामागे 30 ते 40 एम एल पाणी घेणे गरजेचे आहे. 60 किलो वजन असलेल्या व्यक्तीने दिवसातून अडीच ते तीन लिटर पाणी आवश्यक प्यावं. यामुळे देखील त्वचारोग आपल्यापासून दूर राहण्यास मदत होईल. अशाप्रकारे हिवाळ्यामध्ये आपल्या त्वचेचे ओठांचं आणि केसांचं आरोग्य आपण उत्तम राखू शकतो, अशी माहिती जालना शहरातील आरोग्य तज्ज्ञ डॉक्टर अमृता कुलकर्णी यांनी दिली.
advertisement
सूचना: इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी, आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वत: डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
थंडीच्या दिवसात तुम्ही ही चूक करता, होऊ शकतो गंभीर परिणाम, डॉक्टरांनी दिला मोलाचा सल्ला
Next Article
advertisement
Virar Rename as Dwarkadhish : ''अच्छा नाम नही है...'',विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची लाट
'अच्छा नाम नही है...',विरारचे नाव द्वारकाधीश? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची
  • विरारचं नाव ‘द्वारकाधीश’ करण्याचा प्रस्ताव चर्चेत

  • शहरात आणि सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली

  • या संभाव्य नामांतराला उत्तर भारतीय समाजातील काही घटकांचा पाठिंबा

View All
advertisement