Aloe vera : डोळ्यांखालच्या काळ्या वर्तुळांसाठी कोरफडीचा वापर करा, या 4 गोष्टी मिसळून लावा, काळी वर्तुळं होतील दूर
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
डोळ्यांखाली काळी वर्तुळं ही समस्या अनेकांना भेडसावते. ही काळी वर्तुळं कमी करण्यासाठी, कोरफडीचा वापर करणं उपयुक्त ठरतं.
मुंबई : कोरफडीचा योग्य वापर केला तर डोळ्यांखालची काळी वर्तुळं कमी होऊ शकतात. अपुरी झोप, डिहायड्रेशनमुळे त्वचा निस्तेज दिसते, त्यामुळे काळी वर्तुळं आणखी गडद दिसतात. डोळ्यांखाली काळी वर्तुळं ही समस्या अनेकांना भेडसावते. ही काळी वर्तुळं कमी करण्यासाठी, कोरफडीचा वापर करणं उपयुक्त ठरतं.
कोरफडही डोळ्यांखाली साध्या पद्धतीने लावता येते. यामुळे काळी वर्तुळे कमी होऊ शकतात. कोरफडीचा ताजा पल्प किंवा कोरफड जेल घ्या आणि डोळ्यांखाली हळू घासा. कोरफड 15 ते 20 मिनिटं काळ्या वर्तुळांवर ठेवा किंवा तुम्ही रात्रभर ठेवू शकता. तसंच कोरफडीसोबत काही जिन्नसांचं मिश्रण लावणं देखील काळी वर्तुळं कमी करण्यासाठी उपयोगी ठरतात. पाहूयात काही पर्याय.
advertisement
कोरफड आणि बटाट्याचा रस
बटाट्याच्या रसातील नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्म काळी वर्तुळं कमी करण्यासाठी प्रभावी आहेत. एका भांड्यात अर्धा चमचा कोरफड जेल टाका आणि त्यात २ चमचे बटाट्याचा रस घाला. ही पेस्ट मिक्स करून काळ्या वर्तुळांवर १५ मिनिटं लावा आणि नंतर धुवा. काही दिवस ते लावल्यानंतर डोळ्यांभोवतीची त्वचा सुधारण्यास सुरुवात होईल.
advertisement
कोरफड आणि गुलाब पाणी
कोरफड जेल आणि गुलाब पाणी समान प्रमाणात मिसळा आणि काळ्या वर्तुळांवर लावा. 10 मिनिटं ठेवल्यानंतर
धुवा. काळी वर्तुळं कमी होतात आणि त्वचेचा कोरडेपणा दूर होतो.
कोरफड आणि मध
अँटी-ऑक्सिडंटनं समृद्ध असलेलं हे मिश्रण काळी वर्तुळं दूर करण्यासाठी उपयुक्त आहे. अर्धा चमचा एलोवेरा जेलमध्ये अर्धा चमचा मध मिसळा आणि पेस्ट बनवा. ही पेस्ट डोळ्याभोवती लावा आणि १५ ते २० मिनिटं ठेवा आणि नंतर धुवा. हे मिश्रण आठवडाभर लावल्यानंतर काळी वर्तुळं बऱ्याच प्रमाणात दूर होतील.
advertisement
Peanuts : शेंगदाणे खाल्ल्यानंतर पाणी का पिऊ नये ? आयुर्वेदानुसार काय योग्य आणि काय अयोग्य ?
कोरफड आणि हळद
काळी वर्तुळं कमी करण्यासाठी हळदीतील औषधी गुणधर्म प्रभावी आहेत. अशा स्थितीत कोरफड
आणि हळद मिसळून लावल्यानंतरही काळी वर्तुळं कमी होऊ लागतात. अर्धा चमचा कोरफडीमध्ये चिमूटभर हळद मिसळून डोळ्यांखाली चोळा. काळी वर्तुळं कमी होण्यासाठी याचा नक्की उपयोग होईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 12, 2024 2:38 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Aloe vera : डोळ्यांखालच्या काळ्या वर्तुळांसाठी कोरफडीचा वापर करा, या 4 गोष्टी मिसळून लावा, काळी वर्तुळं होतील दूर