Water Bottle : प्लास्टिक, कॉपर की मातीची, पाणी पिण्यासाठी कोणती बॉटल सर्वात चांगली? Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
आपल्यापैकी अनेक जण घराबाहेर पडताना पाण्याची बॉटल सोबत घेऊन जातात. पण तुमच्यापैकी अनेक जणांना प्रश्न पडला असेल की आपण कुठली पाण्याची बॉटल वापरावी.
छत्रपती संभाजीनगर : आपल्यापैकी अनेक जण घराबाहेर पडताना पाण्याची बॉटल सोबत घेऊन जातात. ही एक चांगली सवय आहे. पण तुमच्यापैकी अनेक जणांना प्रश्न पडला असेल की आपण कुठली पाण्याची बॉटल वापरावी. म्हणजेच की प्लास्टिक, स्टेनलेस स्टील, कॉपर, काचेची किंवा मातीची. यापैकी कुठली बॉटल वापरणे आपल्या शरीरासाठी चांगले आहे. याविषयीचं आपल्याला आहार तज्ज्ञ जया गावंडे यांनी माहिती दिली आहे.
पाणी पिण्यासाठी कोणती बॉटल वापरावी?
आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे पाणी पिण्यासाठी तुम्ही कॉपरची म्हणजेच तांब्याच्या बॉटलचा वापर हा करू शकता. कारण की तांब्याच्या भांड्यातलं पाणी फिल्टर ते आपल्या शरीरासाठी अत्यंत असे फायदेशीर ठरते. तर तुम्ही कॉपरच्या बॉटल मधलं पाणी पिऊ शकता. पण ही बॉटल घेताना तुम्ही चांगल्या क्वालिटीची घेतली तर व्यवस्थित रित्या ती बॉटल साफ करायला हवी.
advertisement
त्यासोबतच स्टेनलेस स्टीलच्या बॉटल मधलं पाणी पिणे देखील शरीरासाठी चांगले असते. कारण की त्यामध्ये कुठल्याही प्रकारची केमिकलची रिअॅक्शन येत नाही. त्यामुळे तुम्ही त्या बॉटलमधले पाणी पिऊ शकता आणि सोबत देखील ती बॉटल तुम्ही कॅरी करू शकता.
advertisement
तसेच मातीच्या बॉटलमधील पाणी पिणे देखील हे चांगले असते. सध्याला मोठ्या प्रमाणात मातीच्या बॉटल देखील या उपलब्ध आहेत. तर तुम्ही मातीच्या बॉटलमधलं पाणी देखील पिऊ शकता. पण घराबाहेर जाताना आपण मातीची बॉटल घेऊन जाऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही घरामध्ये असताना मातीच्या बॉटलमधलं पाणी प्यावे, असं जया गावंडे सांगतात.
advertisement
तसेच तुम्ही काचेच्या बॉटलमधलं पाणी देखील पिऊ शकता ते देखील चांगले असते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे की सध्याला सर्रास प्लास्टिकच्या बॉटल पाहिला मिळतात. पण या बॉटलमधलं पाणी तुम्ही एकाच वेळेस घेऊ शकता. त्यामध्ये परत पाणी टाकून ते पाणी पिणे घातक असते कारण त्यामध्ये प्लास्टिक असते ते अत्यंत हानिकारक असते. त्यामुळे शक्यतो तुम्ही बिसलरीच्या बॉटलमधलं पाणी पिणे टाळावे, असंही जया गावंडे सांगतात.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
April 17, 2025 8:43 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Water Bottle : प्लास्टिक, कॉपर की मातीची, पाणी पिण्यासाठी कोणती बॉटल सर्वात चांगली? Video