डिमेन्शिया हा खूपच भयंकर आजार; दही खाल्ल्याने अन् कोडी सोडवल्यानं बरा होतो का?, डॉक्टरांनी सांगितली महत्त्वाची माहिती
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
हा आजार एक भयंकर असा विकार आहे. यामुळे मेंदूच्या कार्यात हळूहळू घट होते आणि शेवटी व्यक्तीच्या सामान्य जीवनावर परिणाम होतो. या आजाराचा सर्वात सामान्य प्रकार म्हणजे अल्झायमर आहे. सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ सायकियाट्रिस्टचे प्राध्यापक आणि डॉ. अविनाश यांनी याबाबत माहिती दिली.
शिखा श्रेया, प्रतिनिधी
रांची : मानवी शरीरात असे अनेक आजार असतात, ज्यांच्यावर उपचार करणे खूप कठीण असते. तर काहींवरील उपचार हासुद्धा खूप आश्चर्यकारक असतो. त्यामध्येच एक आजार म्हणजे डिमेन्शिया म्हणजेच स्मृतिभ्रंश. हा एक गंभीर मानसिक आजार आहे. या आजारात व्यक्तीची स्मरणशक्ती आणि विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता खूपच कमी होते. त्यावर यावर उपचार कसे करावेत हेच आपण आज जाणून घेऊयात.
advertisement
हा आजार एक भयंकर असा विकार आहे. यामुळे मेंदूच्या कार्यात हळूहळू घट होते आणि शेवटी व्यक्तीच्या सामान्य जीवनावर परिणाम होतो. या आजाराचा सर्वात सामान्य प्रकार म्हणजे अल्झायमर आहे. हा जगभरातील लाखो लोकांना प्रभावित करतो. झारखंडची राजधानी रांची येथे असलेल्या सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ सायकियाट्रिस्टचे प्राध्यापक आणि डॉ. अविनाश यांनी याबाबत माहिती दिली.
advertisement
लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, डिमेन्शियाचे रुग्ण आपली स्मृती गमावतात. तसेच त्यांना दैनंदिन कामं करण्यासही अडचण होते. हा आजार वेळेनुसार वाढतो आणि यामुळे व्यक्तीच्या सामाजिक आणि कौटुंबिक, वैयक्तिक आयुष्यातही अडचणी निर्माण होतात. काही प्रकरणात तर व्यक्तीची भाषा, निर्णय घेण्याची क्षमता आणि अगदी व्यक्तिमत्वसुद्धा बदलू शकते. तसेच या स्थितीवर कोणताही निश्चित उपचार नाही. मात्र, त्याची लक्षणे नियंत्रित केली जाऊ शकतात, असेही त्यांनी सांगितले.
advertisement
दही खाण्याचा काही फायदा होतो का -
दही खाल्ल्याने हा आजार बरा होतो, याबाबत काही निश्चित असे वैज्ञानिक प्रमाण नाही. पण दहीमध्ये असणारे प्रोबायोटिक्स हे मेंदू आणि आतडे यांच्यातील संबंध सुधारू शकतो आणि मानवाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. मात्र, दही खाल्ल्याने हा आजार होतो, असा दावा करणे योग्य नाही, असेही ते म्हणाले.
advertisement
कोडे सोडवणं किती फायदेशीर?
काही संशोधनं सांगतात की, कोडी सोडवणे, बुद्धीबळ खेळणे हे डिमेन्शियाच्या गतीला कमी करू शकते. यामुळे मेंदू सक्रिय राहतो आणि मानसिक क्षमतेलाही चालना मिळते. खरंतर, हा पूर्णपणे या आजाराला ठिक करण्याचा उपाय नाही. मात्र, मेंदूला सक्रिय ठेवण्यास याची मदत होते.
advertisement
डॉक्टरांनी दिला हा महत्त्वाचा सल्ला -
या आजारावर मात करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे व्यक्तीच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी घ्यायला हवी. नियमित शारीरिक व्यायाम, आरोग्यदायी आहार आणि मानसिक रुपाने सक्रिय राहणाऱ्या गोष्टींमध्ये गुंतणे हे या आजाराचा प्रभाव कमी करू शकतात. तसेच या आजारांची लक्षणांचा सामना करत असलेल्या व्यक्तीने नियमित रुपाने डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. तसेच त्यांनी सांगितलेल्या नियमांचे पालन करायला हवे, असा महत्त्वाचा सल्लाही त्यांनी दिला.
advertisement
सूचना : ही माहिती तज्ज्ञांशी साधलेल्या संवादावर आधारित आहे. याबाबत लोकल18 कोणताही दावा करत नाही.
Location :
Ranchi,Jharkhand
First Published :
August 16, 2024 4:50 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
डिमेन्शिया हा खूपच भयंकर आजार; दही खाल्ल्याने अन् कोडी सोडवल्यानं बरा होतो का?, डॉक्टरांनी सांगितली महत्त्वाची माहिती