रक्तदाब कमी करण्यासाठी होईल मदत; काय आहेत नारळ पाणी पिण्याचे गुणकारी फायदे?

Last Updated:

निरोगी राहायचे असेल तर तुमच्यासाठी नारळपाणी हा एक उत्तम पर्याय आहे. नारळ पाणी हे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते.

+
News18

News18

लतिका तेजाळे, प्रतिनिधी 
मुंबई : नारळ पाणी प्रत्येक आजारावर एक रामबाण औषध आहे. नारळ पाणी फक्त उन्हाळ्यातच नव्हे तर प्रत्येक ऋतूत प्यायला हवे. नारळ पाणी पिल्याने अनेक फायदे होतात. कारण त्यामध्ये भरपूर पोषक घटक असतात. त्यामुळे तुम्हाला जर निरोगी राहायचे असेल तर तुमच्यासाठी नारळपाणी हा एक उत्तम पर्याय आहे. नारळ पाणी हे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते. त्यामुळे आजारी व्यक्तीला नारळ पाणी दिले जाते. नारळाचे पाणी फक्त हायड्रेशनच्या दृष्टीनेच नाही तर शरीराला पोषण देण्याच्या दृष्टीनेही उत्तम आहे. नारळ पाणी पिण्याचे नेमके कोण कोणते फायदे आहेत? याबद्दलचं मुंबईतील आहार तज्ज्ञ आरती भगत यांनी माहिती दिली आहे.
advertisement
नारळ पाणी पिण्याचे फायदे कोणते?
नारळ पाणी हे आपल्या शरीरासाठी अतिशय चांगले मानले जाते. कारण नारळ पाणीमध्ये अँटीऑक्सिडेंट चांगल्या प्रमाणात असतात. जेणे करून आपल्या शरीरातील विषारी घटक कमी होण्यास मदत होते आणि बॉडी डिटॉक्स होते. जर तुम्हाला मधुमेह असेल तर नारळ पाणी पिणे नक्कीच फायदेशीर ठरेल. नारळ पाणी पिल्याने आपले इन्सुलिन लेवल चांगले होते. त्याचबरोबर तुम्हाला किडनी स्टोनचा त्रास असल्यास देखील नारळ पाणी एक उत्तम औषध आहे, असं आरती भगत सांगतात.
advertisement
लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी प्या ऊसाचा रस, काय आहेत आश्‍चर्यकारक फायदे पाहा Video
नारळ पाणीमध्ये कोलेस्ट्रॉल लेवल कमी असल्यामुळे ते शरीरातील फॅट कमी करण्यास मदत करते. परिणामी वजन कमी होते आणि हृदय देखील निरोगी राहते. नारळ पाणीमध्ये पोट्याशिअम आणि मॅग्नेशिअम जास्त असल्यामुळे ते रक्तदाब कमी करण्यास देखील मदत करते. शेवटी उन्हाळ्यात नारळाचे पाणी फक्त हायड्रेशनच्या दृष्टीनेच नाही तर शरीराला पोषण देण्याच्या दृष्टीनेही उत्तम आहे, असंही आरती भगत यांनी सांगितले.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
रक्तदाब कमी करण्यासाठी होईल मदत; काय आहेत नारळ पाणी पिण्याचे गुणकारी फायदे?
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement