Health Tips : व्हिटॅमिन अन् पेशीना मदत, पावसाळ्यात स्वीट कॉर्न खाण्याचे फायदे माहितीये का?
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Mohan Najan
Last Updated:
प्रत्येक ऋतूची एक वेगळीच मजा असते. पावसाळ्यात स्वीट कॉर्न खाण्याचे आपल्या शरीराला खूप फायदे होतात.
छत्रपती संभाजीनगर: प्रत्येक ऋतूची एक वेगळीच मजा असते. आता पावसाळा सुरू आहे तर त्यामध्येही एक वेगळाच आनंद आहे. पावसाळा म्हटलं की आपण अनेक पर्यटन स्थळे फिरण्यासाठी जात असतो आणि या ठिकाणी गेल्यानंतर आपण हमखास एक पदार्थ खातो तो म्हणजे की स्वीट कॉर्न किंवा भुट्टा हा खात असतो. पण हे स्वीट कॉर्न खाण्याचे आपल्या शरीराला खूप फायदे होतात. तर स्वीट कॉर्न खाण्याचे आपल्या शरीराला काय फायदे होतात? त्यातून कुठले घटक आपल्याला मिळतात? याविषयी आहार तज्ज्ञ प्राची डेकाटे यांनी माहिती सांगितली आहे.
पावसाळ्यामध्ये स्वीट कॉर्न खाणे हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतं. स्वीट कॉर्न हा एक तंतुमय पदार्थ आहे आणि तो आपल्या शरीरासाठी खूप फायदा देतो. यामध्ये भरपूर प्रमाणात मिनरल, व्हिटॅमिन हे घटक असतात. ते आपल्या शरीरासाठी फायदेशीर असतात.
advertisement
आपल्या शरीरातील ज्या पेशी असतात त्या डॅमेज होण्यापासून हे मदत करतात. यामध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते आणि ते आपल्या स्किनसाठी देखील फायदेशीर होते. स्वीट कॉर्नमध्ये पोटॅशियमच देखील भरपूर प्रमाण आहे आणि ते देखील फायदेशीर ठरतं. हे जे स्वीट कॉर्न आहे हे तुम्ही वेगवेगळ्या पदार्थांच्या माध्यमातून खाऊ शकता याचं सूप देखील करू शकतात.
advertisement
तुम्ही हे भाजून किंवा बॉईल करून देखील खाऊ शकता. पण ज्यांना शुगर आहे त्यांनी हे कमी प्रमाणात खावं म्हणजे जेणेकरून याचा वाईट परिणाम हा त्यांच्या वरती होणार नाही, असं आहार तज्ज्ञांनी सांगितले आहे.
तसंच यामध्ये मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट देखील आहे. त्यासोबतच मधुमकामध्ये अँटिबायोटिक कीटक असतात आणि आपल्या पोटात जे वाईट बॅक्टेरिया आहेत ते रोखण्यासाठी देखील मदत करतात. त्यामुळे तुम्हाला जर मधुमका खायचा असेल तर तो तुम्ही खावा पण त्याच्या प्रमाणातच खावा, असंही आहार तज्ज्ञांनी सांगितले आहे.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Jun 28, 2025 10:01 PM IST
मराठी बातम्या/हेल्थ/
Health Tips : व्हिटॅमिन अन् पेशीना मदत, पावसाळ्यात स्वीट कॉर्न खाण्याचे फायदे माहितीये का?







