advertisement

Health Tips: बाप्पाच्या पूजेला जास्वंदीच्या फुलाला विशेष महत्त्व, पण आरोग्यासाठीही गुणकारी, हे फायदे माहितीये का?

Last Updated:

जास्वंदीचा वापर फक्त धार्मिक कार्यांसाठी मर्यादित नाही त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत जे आपल्याला बहुतेक माहित नाहीत. आयुर्वेदात जास्वंदीच्या झाडाला विशेष महत्त्व आहे.

+
जास्वंदाचे

जास्वंदाचे फुल फक्त पूजेपुरते नाही, त्याचे अनेक चमत्कारिक फायदे ऐकून थक्क व्हाल

पुणे: गणपती बाप्पाच्या पूजेच्या विधीत जास्वंदीच्या फुलाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या घरी सध्या जास्वंदीची फुले येत असतील. बाप्पाला फुल वाहिल्यानंतरही अनेकजण दुसऱ्या दिवशी ती फुल टाकून देतात. पण हे फुल योग्य प्रकारे वापरले तर त्याचे अनेक फायदे तुम्हाला होऊ शकतात.
धार्मिक कार्यांपुरते मर्यादित नाही
जास्वंदीचा वापर फक्त धार्मिक कार्यांसाठी मर्यादित नाही, त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत जे आपल्याला बहुतेक माहीत नाहीत. आयुर्वेदात जास्वंदीच्या झाडाला विशेष महत्त्व आहे. जास्वंदाच्या फुलाचे तसेच पानाचे अनेक फायदे सांगितले आहेत.
केसांसाठी उपयोग
जास्वंदाच्या फुलाचा आणि पानाचा लेप केसगळती आणि कोंड्याच्या समस्यांवर उत्तम उपाय आहे. यामुळे केसांचे फॉलिकल्स मजबूत होतात आणि केसांची वाढ अधिक चांगली होते. विविध अभ्यासांनी याची उपयुक्तता सिद्ध केली आहे.
advertisement
रक्तवर्धक आणि ब्लडप्रेशर नियंत्रक
जास्वंदीचे फुल सुकवून त्याची पावडर करून दुधासोबत घेतल्यास रक्ताची कमतरता दूर होते. तसेच हे फुल ब्लडप्रेशर नियंत्रित ठेवण्यासाठी गुणकारी आहे. तरीही उपाय करण्याअगोदर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
डायबिटीस नियंत्रण
जास्वंदीच्या पानांचे दररोज सेवन किंवा फुल-पानाचा चहा डायबिटीस नियंत्रित करण्यास मदत करतो. मात्र, अस्थमा किंवा दमा असल्यास आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
advertisement
त्वचेसाठी उपयोग
जास्वंदीच्या पानाचा रस चेहऱ्याला लावल्यास कोरडेपणा कमी होतो आणि त्वचा निरोगी आणि नाजूक राहते. हे फुल त्वचा सुंदर ठेवण्यासाठी नैसर्गिक उपाय मानले जाते.
गणपती बाप्पाला आवडते हे फुल केवळ पूजेपुरते मर्यादित नाही, त्याचा रोजच्या जीवनात योग्य वापर केल्यास सौंदर्य, आरोग्य आणि मानसिक तणाव कमी करण्यासही मदत होते.
advertisement

view comments
मराठी बातम्या/हेल्थ/
Health Tips: बाप्पाच्या पूजेला जास्वंदीच्या फुलाला विशेष महत्त्व, पण आरोग्यासाठीही गुणकारी, हे फायदे माहितीये का?
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement