advertisement

Health Tips : बंद डब्यातलं अन्न खाताय? आरोग्यावर होतो असा परिणाम, आहार तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला

Last Updated:

चमचमीत दिसणारं, झटपट मिळणार पण आरोग्याच्या मुळावर उठणारं डब्यातील अन्न. ‎एकदा डब्बा उघडला की चव लागते, पण हळूहळू शरीरात साठत जातात आजारांचे बीज.

+
News18

News18

छत्रपती संभाजीनगर : आजच्या धावपळीच्या जीवनात वेळ वाचवण्यासाठी आपण काय निवडतो? चमचमीत दिसणारं, झटपट मिळणार पण आरोग्याच्या मुळावर उठणारं डब्यातील अन्न. ‎एकदा डब्बा उघडला की चव लागते, पण हळूहळू शरीरात साठत जातात आजारांचे बीज. दिसायला आकर्षक, पण आतून घातक असलेलं हे अन्न आपल्या आरोग्यावर नेमका कसा परिणाम करतं? डब्यातील अन्नाचे दुष्परिणाम काय होतात? ह्याविषयी आहार तज्ज्ञ जया गावंडे यांनी माहिती दिली आहे.
डबाबंद पदार्थ म्हणजे प्रोसेस फूड नेमकं काय असतं तर ते म्हणजे कुठलाही पदार्थ त्याच्या क्षमतेपेक्षा जास्त टिकवून ठेवण्यासाठी त्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रिझर्वेटिव्ह वापर होतो. त्यामध्ये एकतर साखर किंवा मीठ असू शकतं. आणि आणखीन काही प्रिझर्व्हेटिव्ह असू शकतात. जी गोष्ट खराब होण्यासारखी आहे ती टिकवून ठेवण्यासाठी त्यासाठी प्रोसेस करावी लागते.
advertisement
ही प्रोसेस करताना अतिरिक्त प्रमाणात साखर आणि मिठाचा वापर होतो. आणि जर अतिरिक्त प्रमाणात साखर घेतली तर ती तुमच्या शरीरावरती मोठ्या प्रमाणात वाईट परिणाम करते. जर आपण मोठ्या प्रमाणात खाल्लं तर आपल्याला हृदयविकाराचा, हायपरटेन्शनचा, किडनीचा या सगळ्याचा धोका होऊ शकतो. जी मुलं मोठ्या प्रमाणात असं फूड खात असतील तर त्यांचं कॉन्सन्ट्रेशन होत नाही, चिडचिड होते, लक्ष लागत नाही.
advertisement
आणखी एक गोष्ट म्हणजे हे फूड प्रोसेस केल्यानंतर त्यामधले जे पौष्टिक घटक आहेत ते थोड्या प्रमाणामध्ये कमी होतात. त्यामुळे कधी ताजं अन्न खाल्लेलं चांगलं. अन्नातून पौष्टिक घटक नाहीसे होतात आणि अगदी कॅलरीज जास्त होतात. हे आपल्यासाठी हानिकारक आहे. वजन वाढतं, त्यासोबतच हृदयविकार देखील शक्यता वाढते. त्यासोबतच जे लोक नेहमी असे फूड खातात त्यांच्यामध्ये या आजारांचा धोका जास्त वाढतो त्यामुळे घरगुती ताजे अन्न खा यामध्ये पालेभाज्या, डाळी, कडधान्यांचा समावेश करा. जेणेकरून तुमच्या सगळ्या गोष्टी नियंत्रणात राहतील, असं आहार तज्ज्ञांनी सांगितलं आहे.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Health Tips : बंद डब्यातलं अन्न खाताय? आरोग्यावर होतो असा परिणाम, आहार तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
Next Article
advertisement
Gold Price : ऐन लग्नसराईत खिशावरचा भार वाढला, सोन्यानं बजेट बिघडवलं, दर ऐकाल तर डोळे होतील पांढरे
ऐन लग्नसराईत खिशावरचा भार वाढला, सोन्यानं बजेट बिघडवलं, दर ऐकाल तर डोळे होतील पा
  • लग्नासाठी किंवा गुंतवणुकीसाठी सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत

  • जागतिक बाजारातील घडामोडी आणि लग्नसराईमुळे वाढलेली मागणी यामुळे सोन्याच्या दराने

  • सोन्याचे दर पुन्हा एकदा वाढल्याने ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

View All
advertisement