Health Tips: मोबाईलचा अतिरिक्त वापर करताय? वेळीच व्हा सावध, नाहीतर हे आजार नाही सोडणार साथ, Video
- Reported by:Prashant Pawar
- Published by:Mohan Najan
Last Updated:
आजच्या काळात मोबाईल हा जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. संवाद, माहिती, मनोरंजन आणि कामासाठी मोबाईल आवश्यक असला तरी त्याचा अतिरेकी वापर आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे.
बीड: आजच्या काळात मोबाईल हा जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. संवाद, माहिती, मनोरंजन आणि कामासाठी मोबाईल आवश्यक असला तरी त्याचा अतिरेकी वापर आरोग्यासाठी धोकादायक ठरत आहे. मोबाईलच्या अतिरिक्त वापरामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतो, अशी माहिती डॉक्टर सचिन बोरचाटे यांनी दिली.
मोबाईलचा जास्त वापर करणाऱ्यांमध्ये डोळ्यांचे आजार, डोकेदुखी, मानदुखी आणि झोपेचे विकार वाढतात. सतत स्क्रीनकडे पाहिल्याने डोळ्यांचा कोरडेपणा जाणवतो आणि दृष्टी कमी होण्याची शक्यता वाढते. रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरल्यामुळे झोपेची गुणवत्ता खालावते आणि थकवा जाणवतो.
advertisement
मानसिक आरोग्यावरही मोबाईलचा तितकाच वाईट परिणाम होतो. सोशल मीडिया आणि गेमिंगच्या अतिरेकामुळे ताणतणाव, चिंता, नैराश्य आणि एकटेपणा वाढतो. तरुण आणि लहान मुलांमध्ये अभ्यासात रस कमी होणे, एकाग्रता ढासळणे आणि समाजापासून दुरावा निर्माण होणे यांसारखी लक्षणे दिसतात.
मोबाईलच्या वापरामुळे शारीरिक हालचाली कमी झाल्याने लठ्ठपणा, मधुमेह, रक्तदाब यांसारखे आजार वाढण्याचा धोका असतो. दिवसभर मोबाईलमध्ये गुंतल्याने व्यायाम आणि खेळापासून लोक दूर राहतात. परिणामी शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते आणि आजार पटकन होण्याची शक्यता वाढते.
advertisement
या सर्व त्रासांपासून वाचण्यासाठी मोबाईलचा वापर मर्यादित ठेवणे गरजेचे आहे. झोपेच्या आधी मोबाईल टाळावा, दिवसातून ठराविक वेळच वापर करावा आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी 20-20-20 नियम पाळावा. म्हणजे दर 20 मिनिटांनी 20 फूट दूर असलेल्या वस्तूकडे 20 सेकंद पाहणे. मोबाईल जीवनासाठी उपयुक्त असला तरी त्याचा अतिरेक धोकादायकच ठरतो.
Location :
Bid (Beed),Bid,Maharashtra
First Published :
Sep 25, 2025 7:04 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Health Tips: मोबाईलचा अतिरिक्त वापर करताय? वेळीच व्हा सावध, नाहीतर हे आजार नाही सोडणार साथ, Video








