चिया आणि सब्जा सीड्समध्ये फरक काय? खाण्याचे शरीराला फायदे कोणते? आहार तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला
- Published by:Mohan Najan
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
चिया आणि सब्जाच्या बियांचे अनोखे फायदे आहेत. दोन्ही प्रकारच्या बियांमध्ये पोषक तत्वांचा साठा दडलेला असतो. दोन्ही बियांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते जे रोगप्रतिकारक क्षमता वाढवते.
छत्रपती संभाजीनगर : आजकाल चिया सीड्स आणि सब्जा सीड्स खूप लोकप्रिय आहेत. बहुतेक लोक वजन कमी करण्यासाठी चिया आणि सब्जाच्या बिया वापरतात. चिया आणि सब्जाच्या बियांचे अनोखे फायदे आहेत. दोन्ही प्रकारच्या बियांमध्ये पोषक तत्वांचा साठा दडलेला असतो. दोन्ही बियांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते जे रोगप्रतिकारक क्षमता वाढवते. तर या दोन्ही बियांमध्ये नेमका काय फरक आहे किंवा याचा आपल्याला कसा फायदा होतो? याविषयीचं माहिती आहार तज्ज्ञ जया गावंडे यांनी सांगितली आहे.
चिया सीड्स आणि सब्जा सीड्स या दोन्ही वेगवेगळ्या आहेत. चिया सीड या प्रामुख्याने मेक्सिकन प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. तर सब्जा सीड्स या भारतात आणि जो आशियन प्रदेश आहे त्यामध्ये या आढळतात. दोन्हींचे गुणधर्म वेगवेगळे आहेत. सब्जाच्या वापर या भारतामध्ये पूर्वापारपासून करण्यात येतो. काही सरबत आहेत किंवा जे बेव्हरेजेस आहेत यामध्ये देखील यांचा वापर हा होतो. या दोन्ही सीड्समधून आपल्याला हायड्रेशन मोठ्या प्रमाणात मिळतं. यामुळे आपलं शरीर हे जास्त हायड्रेट राहते.
advertisement
या दोन्ही मधला मुख्य फरक म्हणजे असा की सब्जा सीड्समध्ये मोठ्या प्रमाणात ओमेगा आणि फॅटी ऍसिड असतात. चिया सीड्समध्ये फॅटी ऍसिड कमी असतं. त्याचप्रमाणे फायबर आणि अँटिऑक्सिडंट देखील मोठ्या प्रमाणात आहेत. तसंच चिया सीड्स या दिसायला थोड्या ग्रे कलरमध्ये असतात आणि सब्जा या पूर्णपणे काळ्या प्रकारच्या असतात.
advertisement
सब्जा सीड्स आणि चिया सीड्स या दोन्ही पाण्यात टाकल्यानंतर आकार हा वाढतो म्हणजेच कितीतरी पट फुगतात. या दोन्ही तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून घेऊ शकता. जे वेगवेगळ्या प्रकारचे पेय आहेत त्यामध्ये देखील याचा तुम्ही वापर करू शकता किंवा सलाडमध्ये देखील याचा वापर करू शकता. तसेच ज्यांना मधुमेह आहे की हृदयविकार आहे यांनी तर या दोन्ही बियांचा वापर आपल्या आहारामध्ये करणं गरजेचं आहे. तसंच प्रत्येक व्यक्तीने प्रतिदिन 15 ते 20 ग्रॅम एवढ्याच या सीड्स घेतल्या पाहिजेत, असं आहार तज्ज्ञ जया गावंडे सांगतात.
advertisement
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
April 14, 2025 5:21 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
चिया आणि सब्जा सीड्समध्ये फरक काय? खाण्याचे शरीराला फायदे कोणते? आहार तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला