Ganesh Visarjan 2025: तुम्हाला हे आजार असतील तर गणपती विसर्जन मिरवणुकीत जाऊ नका! डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
गणपती विसर्जनात मोठ्या आवाजात वाजणारे ढोल-ताशे, गर्दी, लांब चालत जाणे, थकवा, हवामानातील बदल हे सर्व हृदयविकार आणि रक्तदाब असणाऱ्या रुग्णांसाठी घातक ठरू शकतं. रुग्णांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.
अमरावती: गणपती बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूक ही भक्तांसाठी श्रद्धा आणि उत्साहाचा सोहळा असतो. मात्र, मोठ्या आवाजात वाजणारे ढोल-ताशे, गर्दी, लांब चालत जाणे, थकवा, हवामानातील बदल यामुळे हृदयविकार आणि रक्तदाब असणाऱ्या रुग्णांसाठी आरोग्याच्या तक्रारी वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे या रुग्णांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. या रुग्णांनी कोणती काळजी घ्यावी? याबाबत हृदयविकार तज्ज्ञ डॉ. सौरभ आंडे यांनी माहिती दिली आहे.
मोठ्या आवाजापासून दूर राहावे
डॉ. सौरभ आंडे सांगतात की, हृदयविकार आणि रक्तदाब असणाऱ्या रुग्णांनी मिरवणुकीत जाण्यासाठी औषधे वेळेनुसार घ्यावीत. तसेच औषधे सोबत ठेवावीत. तसेच मोठ्या आवाजापासून दूर राहावे. ढोल-ताशा, डीजे यांचा मोठा आवाज हृदयावर ताण आणतो. शक्यतो अशा ठिकाणी कमी वेळ थांबा किंवा अशा ठिकाणी जाणे टाळावे. गर्दीत जास्त वेळ उभे राहू नये. धक्काबुक्की, दमछाक टाळण्यासाठी शांत आणि मोकळ्या जागेतून मिरवणूक पहावी.
advertisement
अति उत्साह टाळावा
पाणी पिण्याकडे लक्ष द्यावे. डिहायड्रेशनमुळे रक्तदाब चढउतार होऊ शकतो. त्यामुळे पाणी, ताक, लिंबूपाणी वेळोवेळी घ्यावे. लांब चालत जाणे टाळावे. जास्त चालल्यास थकवा येऊन हृदयावर ताण वाढतो. त्यामुळे पायदळ चालणे टाळावे. अकडीचे कपडे घालणे टाळावे. अंगाला मोकळे, हलके कपडे वापरावेत. उष्णतेमुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. अति उत्साह टाळावा. जोरदार नाचणे, उड्या मारणे यामुळे हृदय गती अचानक वाढू शकते. त्यामुळे त्रास होण्याची शक्यता असते.
advertisement
अचानक त्रास झाल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क करावा
काही वेळ विश्रांती घ्यावी. गरज भासल्यास थोडावेळ शांत जागी बसून आराम करावा. तापमान आणि दमट हवामानाची खबरदारी घ्यावी. जास्त उकाडा किंवा दमट हवा असल्यास शरीर पटकन थकते. त्यामुळे हलक्या थंड जागी थांबणे योग्य असते. अचानक त्रास झाल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क करावा. छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास, चक्कर, घाम येणे याकडे दुर्लक्ष करू नये. तातडीने जवळच्या दवाखान्यात जाऊन उपचार घ्यावेत.
advertisement
तज्ज्ञांनी दिलेल्या सल्लानुसार हृदयविकार आणि रक्तदाब असणाऱ्यांनी मिरवणुकीत सक्रिय सहभाग घेणे टाळावे. भक्तीभाव जपतानाच आरोग्य प्रथम हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊनच मिरवणुकीत सहभागी होण्याचा विचार करावा, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.
view commentsLocation :
Amravati,Maharashtra
First Published :
September 05, 2025 5:53 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Ganesh Visarjan 2025: तुम्हाला हे आजार असतील तर गणपती विसर्जन मिरवणुकीत जाऊ नका! डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला

