पुरेशी झोप होऊनही डोळ्याखालची वर्तुळ जात नाहीत? फक्त करा हे काम नक्की मिळेल फायदा, Video

Last Updated:

तरुण वर्गात जास्तीत जास्त प्रमाणात दिसून येणारी समस्या म्हणजे डोळ्याखाली येणारे काळी वर्तुळे . यावर काय उपाय करावा? या विचाराने तरुणवर्ग चिंतेत आहे. त्यासाठी दैनंदिन आहार महत्वाचा ठरतो.

+
Dark

Dark circles 

अमरावती : अनेकजण डोळ्याखाली असलेल्या काळ्या वर्तुळांमुळे चिंतेत असतात. जास्तीत जास्त तरुण वर्ग या समस्येमुळे त्रस्त आहे. कारण संपूर्ण चेहरा गोरा आणि डोळ्यांखालील काळी वर्तुळे हे बघायला व्यवस्थित दिसत नाही. पण, ही समस्या नेमकी होते कशामुळे? काही वेळा म्हणतात की पुरेशी झोप न झाल्याने ही समस्या होत असेल. पण एरवी सुद्धा अनेकांना ही समस्या निर्माण होते. व्हिटॅमिनच्या कमीमुळे सुद्धा डोळ्याखाली काळी वर्तुळे येतात, असे डॉक्टर सांगतात. यासाठी आहारात कशाचा समावेश करावा? याबाबत माहिती त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अनुराधा टाकरखेडे यांनी दिली आहे.
डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी करण्यासाठी आहारात कशाचा समावेश करावा?
याबाबत माहिती देताना डॉ. टाकरखेडे सांगतात की, सद्यस्थितीमध्ये तरुण वर्गाला अनेक त्वचेच्या समस्या उद्भवत आहे. यामागचे कारण आहे बाहेरील अन्नपदार्थाचे जास्त प्रमाणात सेवन करणे. त्याचबरोबर रसायनयुक्त भाजीपाला आणि इतर पदार्थ. त्याचबरोबर बदलती जीवनशैली. यासर्व बाबींमुळे आपल्या आंतरिक आणि बाहेरील आरोग्यावर परिणाम होतो. यासाठी सकस आहार घेणे गरजेचे आहे.
advertisement
डोळ्यांखालील काळी वर्तुळे हे व्हिटॅमिन B12 आणि आयरनच्या कमतरतेमुळे येतात. त्यामुळे आहारात खजूर, शेवग्याच्या शेंगा आणि पालक याचा समावेश करावा. त्याचबरोबर स्क्रीन टाईमसुद्धा कमी करणे आवश्यक आहे. आपल्या जीवनशैलीत नको ते बदल न करता पाहिजे ते बदल केल्यास आरोग्य सुखदायी होते.
advertisement
डोळ्यांखालील काळी वर्तुळे आल्यास एकदा डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. त्यांच्या सल्ल्याने काही व्हिटॅमिंस टॅब्लेट तुम्ही घेऊ शकता. सकाळी उठल्यापासून आपले दैनंदिन रूटीन व्यवस्थित फॉलो केल्यास सुद्धा अनेक आजार टाळता येतात. बाहेरील अन्न पदार्थ खाणे बंद केल्यास आणि दररोज सकाळी एक ॲपल आहारात घेतल्यास आरोग्य सुदृढ राखण्यास मदत होते. कोणत्याही आजारावर घरगुती उपाय न करता सर्वात आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या. जेणेकरून तुम्हाला कोणतीही हानी पोहचणार नाही, असे डॉ. अनुराधा यांनी सांगितले.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
पुरेशी झोप होऊनही डोळ्याखालची वर्तुळ जात नाहीत? फक्त करा हे काम नक्की मिळेल फायदा, Video
Next Article
advertisement
BMC Mayor BJP List: भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे चर्चेत, पाहा यादी..
भाजपच्या ४९ महिला बीएमसीमध्ये, महापौरपदासाठी या आहेत तगड्या दावेदार, कोणाची नावे
  • मुंबईवर यंदा भाजप आपला झेंडा फडकवण्यासाठी सज्ज झाली आहे.

  • आरक्षण 'सर्वसाधारण महिला' प्रवर्गासाठी निघाल्याने भाजपमधील महिला नगरसेविकांमध्ये

  • भाजपच्या ४९ महिला उमेदवारांनी विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे

View All
advertisement