Pune Gym: जिममध्ये डॉक्टर महिलेच्या पतीचा मृत्यू, तुम्हीही व्यायाम करताना 6 चुका तर करत नाही ना?

Last Updated:

सुदृढ आरोग्यासाठी जिममध्ये व्यायाम करणं फायद्याचं असलं, तरी चुकीच्या पद्धतीने, अतिप्रमाणात किंवा काही लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास ते जीवघेणं ठरू शकतं.

+
News18

News18

पुणे : सुदृढ आरोग्यासाठी जिममध्ये व्यायाम करणं फायद्याचं असलं, तरी चुकीच्या पद्धतीने, अतिप्रमाणात किंवा काही लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास ते जीवघेणं ठरू शकतं. विशेषतः हृदयविकाराच्या काही लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास जिममध्ये अचानक हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो. गेल्या काही काळात जिम करताना हृदयविकारामुळे अचानक मृत्यूच्या घटना वाढल्याचे पाहायला मिळतात. नुकतीच अशी घटना पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये घडली. मिलिंद कुलकर्णी यांचा ह्रदयविकाराच्या धक्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या पत्नी डॉक्टर आहेत.
जिम करताना अतिपरिश्रम, क्षमतेपेक्षा जास्त वजन उचलणे, शरीरात पाण्याची कमतरता आणि इलेक्ट्रोलाइट्सच्या असंतुलनामुळे हृदयावर अनावश्यक ताण येतो. हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये ‘इंटीमा’ हा आतला स्तर फाटल्यास अचानक ब्लड क्लॉट तयार होऊन हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. यामुळे जिममध्ये व्यायाम करतानी काय काळजी घ्यावी? याबद्दलचं तज्ज्ञांनी माहिती दिली आहे.
हृदय तज्ज्ञ डॉ. स्वरूप स्वराज पाल सांगतात की, जास्त वजन जोरात उचलल्यामुळे रक्तदाब वाढतो आणि त्यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्या ताणून फाटू शकतात. अनेकांना त्यांच्या हृदयविकाराची पूर्वकल्पना नसते, त्यामुळे आधी आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे, व्यायाम करताना शरीर गरम झालेले असते. अशा वेळी लगेच थंड पाणी प्यायल्यास शरीरावर उलटा परिणाम होऊ शकतो. त्याऐवजी शरीर थंड झाल्यावर थोड्या प्रमाणात पाणी प्यावे, असा सल्ला त्यांनी दिला.
advertisement
जिम ट्रेनर अनिकेत कुंभार सांगतात की वॉर्म-अप आणि कूल-डाउन ही प्रक्रिया विसरू नये. व्यायाम करताना धडधड वाढणे, चक्कर येणे, छातीत जडपणा ही लक्षणे सामान्य थकवा म्हणून दुर्लक्षित केली जातात. मात्र, ही लक्षणे हृदयविकाराची सुरुवात असू शकतात. धूम्रपान, मद्यपान, झटपट ऊर्जा देणारे पेय आणि असंतुलित आहार हे सुद्धा हृदयासाठी घातक ठरू शकतात. 40 वर्षांवरील पुरुष, ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल किंवा कौटुंबिक इतिहास आहे, त्यांनी विशेष काळजी घ्यावी.
advertisement
काळजी घेण्यासाठी महत्त्वाचे उपाय
जिम सुरू करण्यापूर्वी आरोग्य तपासणी (ईसीजी, बीपी, लिपिड प्रोफाइल) करून घ्यावी.
क्षमतेनुसार व्यायाम करावा, अतिश्रम करू नये.
पुरेसा वॉर्म-अप आणि कूल-डाउन आवश्यक.
ट्रेनरकडून शिकावे.
पुरेसे पाणी आणि संतुलित आहार घ्यावा.
व्यायामानंतर लगेच थंड पाणी पिऊ नये.
नियमित तपासणी आणि योग्य व्यायाम पद्धती यामुळे होणारे नुकसान टाळता येते, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
मराठी बातम्या/हेल्थ/
Pune Gym: जिममध्ये डॉक्टर महिलेच्या पतीचा मृत्यू, तुम्हीही व्यायाम करताना 6 चुका तर करत नाही ना?
Next Article
advertisement
Guess Who: 15 व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज कोट्यवधींची मालकीण आहे ही अभिनेत्री
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
    View All
    advertisement