मेंदूची वाढ होण्यासाठी आहारात समाविष्ट करा या गोष्टी, आहार तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला
- Published by:Mohan Najan
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
मेंदू हा शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे. मेंदू शरीराच्या सर्व कार्यांवर नियंत्रण ठेवतो.
अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : मेंदू हा शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे. मेंदू शरीराच्या सर्व कार्यांवर नियंत्रण ठेवतो. मेंदू तुम्हाला विचार, हालचाल, अनुभव, श्वास आणि बरेच काही करण्यास मदत करतो. एवढेच नाही तर मेंदूचे मुख्य कार्य शरीराच्या विविध भागांना पोषण देणे हे देखील आहे. तर मेंदूची वाढ चांगली व्हावी किंवा मेंदूने चांगलं काम करावे? यासाठी आपण काय खायला हवं? याविषयी माहिती आहार तज्ज्ञ रसिका देशमुख सांगितलेली आहे.
advertisement
मेंदूची वाढ होण्यासाठी आपल्याला वेगळं असं काही घेऊन खाण्याची गरज नाहीये. सर्व आपल्या स्वयंपाक घरामध्येच हे उपलब्ध आहे. मेंदूची वाढ वयाच्या सहाव्या वर्षापर्यंत होत असते. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला वेगळे काही घेऊन खाण्याची गरज नाही आहे. तुमच्या आहारामध्ये प्रोटीनचा, व्हिटॅमिनचा त्याचबरोबर मिनरल्सचा समावेश असला पाहिजे. यामध्ये तुम्ही अंड्याचा वापर करू शकता. दररोज तुम्ही अंडी खाऊ शकतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आहारामध्ये दररोज केळाचा समावेश हा करा, असं आहारत आहार तज्ज्ञ देशमुख सांगतात.
advertisement
दररोज तुम्ही केळ हे खा आणि तुमच्या मुलांना देखील दररोज केळ खायला द्यायलाच पाहिजे. त्यासोबतच जे आपले कडधान्य आहेत ते देखील तुम्ही देऊ शकता. त्यामुळे तुम्ही मटकी, मूग, हरभऱ्यांचा देखील समावेश करावा. तसेच सोयाबीन, शेंगदाणे हे देखील तुमच्या आहारात दररोज असणे गरजेचे आहे. तसंच तुम्ही ड्रायफ्रूट्सचा देखील समावेश करावा. ज्यामध्ये अक्रोड तसेच बदाम हे असलेच पाहिजे. व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन सी हे तुमच्या आहारामध्ये असणं गरजेचं आहे. आणि दररोज तुम्ही किमान आवळा हा खायलाच हवा.
advertisement
या सर्व गोष्टींचा जर तुमच्या आहारात समावेश असेल तर तुमचा मेंदू हा चांगलं काम करेल. त्यामुळे या सर्व गोष्टी तुम्ही दररोज घ्याव्या, असंही आहार आहार तज्ज्ञ रसिका देशमुख यांनी सांगितलं.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
February 09, 2025 3:18 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
मेंदूची वाढ होण्यासाठी आहारात समाविष्ट करा या गोष्टी, आहार तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला