Rice : पांढरा की ब्राऊन राईस? कोणत्या तांदळाचा भात शरिरासाठी फायदेशीर?, Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
भात हा आपल्या देशातील जवळपास 70 ते 80 टक्के लोकांच्या जेवणातील अविभाज्य घटक आहे. तांदळामध्ये पांढरा आणि ब्राऊन राईस हा प्रकार आहे. पां
छत्रपती संभाजीनगर : भात हा आपल्या देशातील जवळपास 70 ते 80 टक्के लोकांच्या जेवणातील अविभाज्य घटक आहे. तांदळामध्ये पांढरा आणि ब्राऊन राईस हा प्रकार आहे. शरिरासाठी पांढरा तांदूळ चांगला की ब्राऊन राईस? याविषयीचं आपल्याला आहार तज्ज्ञ मंजू मठाळकर यांनी माहिती दिली आहे.
advertisement
आपल्याकडे भाताचे दोन प्रकार असतात. एक पांढरा तांदळाचा भात आणि दुसरा ब्राऊन तांदळाचा भात. पांढरा तांदळाचा भात आपल्याकडे मोठ्या प्रमाणात करून खाल्ला जातो. पण पांढऱ्या तांदळापेक्षा ब्राऊन तांदूळ हा चांगला आहे, असं मंजू मठाळकर सांगतात.
advertisement
तसंच अजून एक तांदळाचा प्रकार म्हणजे की हातसडीचा तांदूळ हा देखील तांदळाचा प्रकार आहे आणि तो देखील खाणं चांगले आहे. पांढऱ्या तांदळापेक्षा ब्राऊन तांदळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फायबर असतात आणि ते आपल्या शरिरासाठी फायदेशीर ठरतात. तसंच की ब्राऊन राईसमध्ये मोठ्या प्रमाणात न्यूट्रिएंट असतात. तसंच हा राईस खाल्ल्यामुळे शुगर लेवल जास्त वाढत नाही.
advertisement
तसेच ब्राउन राईसमध्ये मोठ्या प्रमाणात बी कॉम्प्लेक्स विटामिन्स आणि न्यूट्रिएंट असतात जे की शरिरासाठी चांगले असतात आणि हेच पांढऱ्या तांदळामध्ये नसतात कारण की ते पॉलिश केलेले असतात. यामध्ये इतरही पोषक घटक पांढऱ्या तांदळामध्ये कमी असतात.
तसेच जर तुम्ही दररोज भात खात असाल तर नुसता भात तुम्ही खाऊन त्याच्यासोबत भरपूर भाजी घ्यावी. तसेच वरण देखील असले पाहिजे जेणेकरून ते पचायला सोपं जातं आणि इतरही पोषक घटक आपल्या शरिरामध्ये जातात. तसंच ज्यांना शुगर वगैरे आहे त्यांनी भात कमी प्रमाणात खावा, असं आहार तज्ज्ञ मंजू मठाळकर सांगतात.
advertisement
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
April 24, 2025 8:06 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Rice : पांढरा की ब्राऊन राईस? कोणत्या तांदळाचा भात शरिरासाठी फायदेशीर?, Video