Heart Attack आणि Cardiac Arrest सारखं नाही, दोघांमध्ये मोठा फरक, प्रत्येकाला माहिती हवा

Last Updated:

Heart Attack Cardiac Arrest Difference : हार्ट अटॅक आणि कार्डियाक अरेस्ट एकाच गोष्टीसारखे वाटू शकतात, पण त्यांची कारणं, लक्षणं आणि उपचार वेगवेगळे असतात.

News18
News18
मुंबई : हार्ट अटॅक आणि कार्डियाक अरेस्ट हे शब्द एकसारखे वाटतात आणि त्यामुळेच अनेक लोकांचा या दोन आजारांबद्दल गोंधळ उडतो. बऱ्याचदा लोकांना वाटते की, हृदयविकार आणि कार्डियाक अरेस्ट एकच आहेत, पण या आजारांची लक्षणे आणि उपचार वेगवेगळे आहेत. दोघेही हृदयाशी संबंधित जीवघेणे आजार असले तरी, त्यांची कारणे आणि उपचार एकसारखे नसून पूर्णपणे वेगळे आहेत. या बातमीमध्ये, कार्डिओ विभागाचे सहयोगी प्राध्यापक आणि कार्डिओ तज्ज्ञ यांच्या माध्यमातून आपण कार्डियाक अरेस्ट आणि हृदयविकार यांच्यातील फरक समजावून घेऊया.
वैद्यकीय शास्त्रानुसार, या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलमधले वरिष्ठ हृदयरोग विशेषज्ञ डॉ. अमित मित्तल आणि एस एन मेडिकल कॉलेजमधील कार्डिओ विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. बसंत कुमार गुप्ता यांनी कार्डिॲक अरेस्ट आणि हार्ट ॲटॅक या दोन्हींमधला फरक सोप्या भाषेत समजून सांगितला आहे. तसंच, हे दोन्ही प्रकार ओळखायचे कसे आणि त्यापासून बचाव कसा करता येऊ शकतो, हेही त्यांनी सांगितलं आहे.
advertisement
हार्ट अटॅक म्हणजे काय?
डॉ. अमित मित्तल सांगतात, हृदयाला काम करण्यासाठी ऑक्सिजनयुक्त रक्ताची आवश्यकता असते. म्हणजे असं रक्त ज्यामध्ये ऑक्सिजन आहे. हृदयाला हे ऑक्सिजनयुक्त रक्त कोरोनरी धमन्यांद्वारे  पुरवलं जातं. या कोरोनरी धमन्यांमध्ये ब्लॉकेज झालं म्हणजेच अडथळा निर्माण झाला, तर ऑक्सिजनयुक्त रक्त हृदयापर्यंत पोहोचणं बंद होतं.
पुरेसं रक्त न मिळाल्यामुळे हृदयाच्या पेशी हळूहळू मृत होऊ लागतात. परिणामी हृदयाची कार्यक्षमता हळूहळू कमी होत जाते. मग एक वेळ अशी येते, की तेव्हा हृदयाची कार्यक्षमता गरजेपेक्षा बरीच कमी होते. त्यामुळे हृदयावरचा ताण खूप वाढतो. त्यामुळे हृदय कार्य करणं थांबवतं. याला वैद्यकीय भाषेत हार्ट अटॅक असं म्हणतात.
advertisement
वेळेवर हृदयविकाराची जाणीव झाली नाही किंवा वेळेवर उपचार झाले नाहीत, तर मृत्यूची शक्यता वाढत जाते.
डॉ. गुप्ता म्हणाले, लहानपणापासून प्रत्येकाच्या खाण्यापिण्यातून हळूहळू धमन्यांमध्ये प्लाक जमा होतो. जेव्हा प्लेक इतका वाढतो की नसांमध्ये अडथळा निर्माण होतो, ज्याद्वारे हृदय संपूर्ण शरीरात रक्त पंप करते, ज्याला कोरोनरी आर्टरी डिसीज म्हणतात. यामुळे हृदयाला हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका असतो. हा प्लेक धमन्या अरुंद करू शकतो, ज्यामुळे हृदयाकडे होणारा रक्तप्रवाह मंदावतो किंवा पूर्णपणे थांबतो. यामुळे धमनीच्या दुसर्‍या भागात अडथळा निर्माण होऊन ती फुटूही शकते. यानंतर, रुग्णाला छातीत तीव्र वेदना होतात आणि तो बेशुद्ध पडतो, याला हृदयविकाराचा झटका किंवा हार्ट अटॅक म्हणतात.
advertisement
हार्ट अटॅकची लक्षणे
छातीत दाब किंवा वेदना होणे
श्वास घेण्यास त्रास होणे
घाम येणे
छातीत घट्टपणा जाणवणे
खांदा, मान, हात किंवा जबड्यात वेदना पसरणे
मळमळ आणि उलट्यांसह छातीत जळजळ किंवा अपचनाची तक्रार
काही वेळासाठी अचानक चक्कर येणे, बेशुद्ध होणे
कार्डिॲक अरेस्ट म्हणजे काय?
एस एन मेडिकल कॉलेजमधील कार्डिओ विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. बसंत कुमार गुप्ता स्पष्ट करतात की, "हृदयविकाराला तांत्रिक भाषेत मायोकार्डियल इन्फार्क्शन (MI) किंवा कार्डियाक अरेस्ट अटॅक म्हणतात. जेव्हा हृदयाच्या ठोक्यात अडथळा येतो तेव्हा असे होते. जेव्हा हृदय अचानक काम करणे थांबवते तेव्हा कार्डियाक अरेस्ट येतो. कार्डियाक अरेस्टमध्ये, हृदय धडधडणे थांबवते आणि महत्वाच्या अवयवांना रक्त पोहचत नाही. अशा स्थितीत, काही मिनिटांतच रुग्णाचा मृत्यू होतो."
advertisement
डॉ. अमित मित्तल सांगतात, की कार्डिॲक अरेस्ट म्हणजे हृदय अडकणं. अशावेळी हृदय पूर्णपणे काम करणं बंद करतं, तेव्हा त्याला कार्डिॲक अरेस्ट असं म्हटलं जातं.
हृदयामध्ये सोडियम, कॅल्शियम, आणि पोटॅशियमचे चॅनेल्स असतात. या चॅनेल्समध्ये असंतुलन निर्माण झालं, तर हृदयाची धडधड अनियमित होते. त्याला वैद्यकीय भाषेत व्हीटीबीएस (VTBS) असं म्हटलं जातं. अशा स्थितीत संबंधित रुग्णाला वेळेत इलेक्ट्रिक शॉक दिला गेला नाही, तर त्याचा मृत्यू होतो.
advertisement
शॉक मिळायला जितका वेळ लागेल, त्या प्रत्येक मिनिटाला प्राण वाचण्याची शक्यता 10 टक्के कमी होत जाते.
डॉ. मित्तल म्हणतात, की या परिस्थितीतून बचाव करण्यासाठी आता बरीच उपकरणं उपलब्ध झाली आहेत. अतिजोखमीच्या रुग्णांमध्ये ती उपकरणं बसवली जातात.
शरीराच्या कोणत्याही भागात आजार असेल किंवा अनियमितता असेल, तर त्याची जाणीव शरीर आपल्याला करून देत असतं. ते संकेत आपल्याला योग्य वेळी ओळखता आले पाहिजेत. शारीरिक हालचाली करताना श्वास लागतो किंवा छातीत दुखतं. अशा स्थितीत रुग्णाच्या हृदयाची कोरोनरी आर्टरी ब्लॉक झालेली असते.
advertisement
शारीरिक कष्टांच्या वेळी जास्त रक्तप्रवाहाची गरज असते. तेव्हा हृदयावर ताण आल्याने छातीत दुखतं किंवा धाप लागते. घाबरल्यासारखंही होतं. असं ही डॉक्टर मित्तल सांगतात.
कार्डियाक अरेस्टची लक्षणं
चक्कर येणे
अचानक श्वास घेण्यास त्रास होणे
छातीत दुखणे
सामान्यतः हात किंवा पायांमध्ये झटके
एक तास आधी मळमळ किंवा उलट्या होणे
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Heart Attack आणि Cardiac Arrest सारखं नाही, दोघांमध्ये मोठा फरक, प्रत्येकाला माहिती हवा
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement