HMPV Virus : धाकधूक वाढली! महाराष्ट्राच्या जवळ आला चीनी व्हायरस, गुजरातमध्ये 2 महिन्यांच्या बाळाला HMPV

Last Updated:

चीननंतर भारतातही ह्यूमन मेटान्यूमोवायरसची प्रकरणं समोर येत आहेत. भारतात कर्नाटकनंतर महाराष्ट्राशेजारी असलेल्या गुजरातमध्येही HMPV चा रुग्ण सापडला आहे.

News18
News18
नवी दिल्ली : कोरोनातून सुटका झाल्यानंतर आता HMPV ची महासाथ येते की काय अशी भीती निर्माण झाली आहे. कारण चीनमध्ये कोरोनानंतर थैमान घालणारा एचएमपीव्ही व्हायरस आता भारतातही घुसला आहे. एचएमपीव्हीचा भारतात आणखी एक रुग्ण सापडला आहे. नवा रुग्ण हा अगदी महाराष्ट्राजवळच सापडल्याने देशासह राज्याचं टेन्शन वाढलं आहे.
चीननंतर भारतातही ह्यूमन मेटान्यूमोवायरसची प्रकरणं समोर येत आहेत. भारतात HMPV चे एकूण 3 रुग्ण सापडले आहेत. पहिले दोन रुग्ण कर्नाटकात आता तिसरा रुग्ण महाराष्ट्राशेजारील राज्य गुजरातमध्ये सापडला आहे. अहमदाबादमध्ये अवघ्या 2 महिन्यांच्या मुलाला एचएमपीव्हीची लागण झाली आहे. त्याआधी बंगळुरूमध्ये 8 आणि 3 महिन्यांच्या मुलांमध्ये हा व्हायरस आढळून आला आहे.
advertisement
भारतात सोमवारी (6 जानेवारी 2025) एकाच दिवसात 3 रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान हा व्हायरस भारतात येण्याआधी आरोग्य सेवांचे महासंचालक (DGHS) डॉ. अतुल गोयल यांनी सांगितलं की, मानवी मेटापन्यूमोव्हायरस इतर श्वसन विषाणूंप्रमाणे आहे, ज्यामुळे सामान्य सर्दी होते. यामुळे तरुण आणि वृद्ध लोकांमध्ये फ्लूसारखी लक्षणं दिसू शकतात. नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल HMPV आणि सीझनल इन्फ्लूएंझाच्या प्रकरणांवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि आंतरराष्ट्रीय एजन्सींच्या संपर्कात आहे.
advertisement
हा विषाणू काय आहे आणि तो माणसांसाठी किती धोकादायक आहे? हे जाणून घेण्यासाठी आम्ही दिल्ली एनसीआरमधील प्रसिद्ध हॉस्पिटल मॅक्स हॉस्पिटलचे वरिष्ठ पल्मोनोलॉजिस्ट डॉ. शरद जोशी यांच्याशी संवाद साधला तेव्हा त्यांनी सांगितलं की, ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) हा नवीन विषाणू नाही.  पण दावा केला जात आहे की त्याच्या नवीन व्हेरियंटने चीनमध्ये हाहाकार माजवला आहे.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
HMPV Virus : धाकधूक वाढली! महाराष्ट्राच्या जवळ आला चीनी व्हायरस, गुजरातमध्ये 2 महिन्यांच्या बाळाला HMPV
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement