बापरे! नागपुरात Bird Flu चे शिकार झाले 3 वाघ आणि एक बिबट्या, राज्यात पहिल्यांदाच घडलं, उडाली खळबळ 

Last Updated:
Bird Flu killed Tiger Leopard in Nagpur : बर्ड फ्लू ज्याच्यामुळे तुम्ही आजवर पक्ष्यांचा मृत्यू झाल्याची प्रकरणं पाहिली असतील. या आजाराने वाघ, बिबट्यासारख्या प्राण्यांचा जीव घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे.
1/9
नागपूरच्या गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमधील 3 वाघ आणि एका बिबट्याचा बर्ड फ्लूमुळे मृत्यू झाला आहे. राज्यात पहिल्यांदाच अशी घटना घडली आहे.

advertisement
2/9
तीनही वाघांना नागरी वस्त्यांवरील हल्ल्यामुळे बंदिस्त करण्यात आलं होतं. चंद्रपूरच्या सेंट्रलमध्ये उपचार घेत असलेल्या या 3 वाघांना 3 आठवड्यांपूर्वी नागपूर गोरेवाडा रेस्क्यू सेंटर इथं आणण्यात आलं होतं.  त्यांच्यावर नागपूर इथंच उपचार सुरू होते.

3/9
8 दिवसांपूर्वी या 3 वाघांचा आणि एका बिबट्याचा मृत्यू झाला, त्यामुळे खळबळ उडाली होती. या वाघांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचं कारण जाणून घेण्यासाठी त्यांच्या अवयवांचे नमुने भोपाळ येथील पशुवैद्यकीय प्रयोगशाळेत पाठवण्यात आले.

4/9
भोपाळ येथील अहवाल प्राप्त झाला. त्यात वाघ आणि बिबट्याचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

5/9
इतर प्राण्यांना बर्ड फ्लूची लागण होऊ नये म्हणून पिंजऱ्यांची निर्जंतुकीकरण आणि सफाईकरण केलं जातं आहे.

6/9
बर्ड फ्लू म्हणजे एव्हियन फ्लू किंवा एव्हियन एन्फ्लुएंझा. सेंटर फॉर डिसीज कंट्रोलनुसार हा रोग पोल्ट्री आणि इतर पक्षी, प्राण्यांना बाधित करू शकतो.

7/9
युरोपियन सेंटर फॉर डिसज प्रिव्हेंशन अँड कंट्रोल (इसीडीसी)नुसार एच5एन8, एच5एन5, एच5एन1 आणि एच5एन9 हे पक्ष्यांमध्ये सामान्यतः आढळणारे फ्लूचे विषाणू आहेत.

8/9
सेंटर फॉर डिसीज कंट्रोलनुसार (सीडीसी) सामान्यतः एव्हियन फ्लू माणसांना बाधित करत नाही. असा संसर्ग दुर्मिळ असतो. पक्षी किंवा पक्ष्यांच्या विष्ठेशी जवळून संपर्क आल्यास त्या व्यक्तींना बर्ड फ्लू होऊ शकतो. बाधित पक्ष्यांच्या विष्ठेने दूषित झालेल्या पाण्यात पोहून किंवा आंघोळ करूनही विषाणूची बाधा होऊ शकते.

9/9
तरीही हा संसर्ग माणसांना झाल्यास तो सामान्यतः सौम्य असतो. खूप कमी रूग्णांना आयसीयूची गरज भासू शकते. खोकला, ताप, घसा सुजणं, स्नायू दुखणं, डोकेदुखी, श्वास घेण्‍यास त्रास होणं अशी याची लक्षणं आहेत.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement