Holi 2024 : होळीच्या रंगांमुळे त्वचा झालीये लाल? नारळाच्या तेलात 3 गोष्टी मिसळा मिळेल आराम
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
काहीवेळा चेहऱ्यावरील रंग काढल्यावर चेहरा लाल होतो आणि त्यावर रॅशेस उठतात अशावेळी तुम्ही नारळ तेलात काही गोष्टी मिसळून लावल्यास आराम मिळू शकतो.
सोमवारी सर्वत्र धुलिवंदनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. या दिवशी लोक रंगीबेरंगी रंगात न्हाऊन निघतात. परंतु अनेकदा बाजारात होळीनिमित्त पक्के आणि केमिकल युक्त रंग देखील मिळतात. जर असे रंग त्वचेवर लागले तर ते सहजासहजी निघत नाहीत तसेच अनेकदा यामुळे त्वचेचे देखील नुकसान होते. काहीवेळा चेहऱ्यावरील रंग काढल्यावर चेहरा लाल होतो आणि त्यावर रॅशेस उठतात अशावेळी तुम्ही नारळ तेलात काही गोष्टी मिसळून लावल्यास आराम मिळू शकतो.
काहीवेळा केमिकलयुक्त रंगांमुळे त्वचेवर रॅशेस, जळजळ आणि त्वचा लालसर होणे अशा समस्या जाणवतात. तेव्हा अशा समस्यांपासून आराम मिळण्यासाठी काही टिप्स फॉलो करा.
नारळ तेल किंवा देशी तूप :
त्वचेवरील होळीचा रंग स्वच्छ केल्यावर नारळ तेल किंवा देशी तुपाने मसाज करा. यामुळे तुम्हाला रॅशेस किंवा जळजळ होत असल्यास यापासून आराम मिळेल. तसेच यामुळे तुमची त्वचा देखील हायड्रेट होईल आणि डलनेस निघून जाईल.
advertisement
एलोवेरा जेल :
त्वचेसाठी एलोवेरा जेल किती फायदेशीर ठरते हे सर्वांनाच ठाऊक आहे. त्वचेवरील होळीचे रंग स्वच्छ केल्यावर जर त्वचेवर खाज येत असेल तर त्यावर फ्रेश एलोवेरा जेल लावल्यास आराम मिळू शकतो. एलोवेरा जेलमुळे त्वचेची जळजळ कमी होते.
दही आणि बेसन :
त्वचेवर लागलेले रंग काढल्यावर जर त्वचेवर जळजळ होत असेल तर तुम्ही बेसन, दही, एलोवेरा जेल इत्यादी एकत्र करून एक स्मूद पेस्ट तयार करून त्वचेवर लावा. काहीवेळाने चेहऱ्यावर लावलेली पेस्ट 75 से 80 टक्के सुकली की मग त्वचा धवून टाका. यामुळे त्वचेचा लालसरपणा आणि जळजळ कमी होईल.
advertisement
बर्फ चोळा :
होळीचे रंग काढल्यावर त्वचा लालसर होत असेल किंवा त्यावर जळजळ होत असेल तर तुम्ही एका कापडात बर्फाचे तुकडे घेऊन त्याने त्वचेला शेक द्या. यामुळे त्वचेवर होणारी जळजळ कमी होईल आणि आराम मिळेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 25, 2024 9:12 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Holi 2024 : होळीच्या रंगांमुळे त्वचा झालीये लाल? नारळाच्या तेलात 3 गोष्टी मिसळा मिळेल आराम