advertisement

Pigmentation : चेहऱ्यासाठी वापरा टोमॅटो, तांदुळाचं पीठ, जाणून घ्या पद्धत आणि फायदे

Last Updated:

जास्त वेळ उन्हात राहणं, त्वचेवर मेलेनिनचं जास्त उत्पादन होणं आणि त्वचेची काळजी घेण्यासाठी उत्पादनांचा अति वापर यामुळे फ्रिकल्स (पिग्मेंटेशन) होऊ शकतात. चेहऱ्यावरचे डाग घालवण्यासाठी आणखी काही जिन्नस उपयोगी आहेत. तांदळाचं पीठ, मुलतानी माती वापरुन तसंच बटाट्याचा रस, दही, हळद हे पदार्थ वापरल्याही डाग कमी होतात. 

News18
News18
मुंबई : अनेकांच्या चेहऱ्यावर पुंजक्यासारखे डाग असतात. त्याची अनेक कारणं असू शकतात. जास्त वेळ उन्हात राहणं, त्वचेवर मेलेनिनचं जास्त उत्पादन होणं आणि त्वचेची काळजी घेण्यासाठी उत्पादनांचा अति वापर यामुळे फ्रिकल्स (पिग्मेंटेशन) होऊ शकतात. गालावर किंवा कपाळावर फ्रिकल्स अधिक दिसतात.
या फ्रिकल्समुळे चेहऱ्यावरच्या त्वचेचा रंगही एकसारखा दिसत नाही. यासाठी आयुर्वेदिक तज्ज्ञांनी घरगुती वस्तू वापरून फ्रिकल्स कमी करण्यासाठीच्या टिप्स दिल्या आहेत. यासाठी सर्वप्रथम, अर्धा टोमॅटो, दोन चमचे तांदळाच्या पिठात बुडवा आणि हा टोमॅटो संपूर्ण चेहऱ्यावर चोळा. यामुळे चेहऱ्यावरील मृत त्वचेच्या पेशी निघून जातील, ब्लॅकहेड्स कमी होतील आणि चेहरा स्वच्छ होईल.
advertisement
चेहऱ्यावरचे डाग घालवण्यासाठी आणखी काही जिन्नस उपयोगी आहेत. तांदळाचं पीठ, मुलतानी माती वापरुन तसंच बटाट्याचा रस, दही, हळद हे पदार्थ वापरल्याही डाग कमी होतात.
फेसपॅक बनवण्यासाठी, एका भांड्यात दोन चमचे तांदळाचं पीठ आणि एक चमचा मुलतानी माती घ्या. त्यात दोन चमचे दही घालून एक पॅक बनवा. हा तयार केलेला फेस पॅक चेहऱ्यावर लावा आणि पंधरा मिनिटं ठेवा आणि नंतर धुवा. आठवड्यातून एकदा हा फेस पॅक लावा. यामुळे डाग कमी करण्यासाठी मदत होईल.
advertisement
बटाट्याचा रस - बटाट्याचा रस देखील फ्रिकल्स कमी करण्यासाठी प्रभावी उपाय आहे. चेहऱ्यावर बटाट्याचा रस लावण्यासाठी, प्रथम बटाटा किसून घ्या आणि नंतर त्याचा रस काढण्यासाठी तो पिळून घ्या. हा रस कापसाच्या मदतीनं चेहऱ्यावर लावता येतो. आठवड्यातून दोन ते तीन वेळा वापरल्यानं फ्रिकल्स कमी होऊ शकतात.
advertisement
हळद दह्यात मिसळून चेहऱ्यावर लावता येते. हळदीत भरपूर औषधी गुणधर्म असतात. ज्यामुळे हळद त्वचेला उजळवते आणि डाग कमी होतात. तर दह्यामुळे त्वचेला एक्सफोलिएटिंग गुणधर्म मिळतात आणि त्वचेला मॉइश्चरायझेशन देखील मिळतं. चेहऱ्यावर काहीही लावण्याआधी पॅच टेस्ट नक्की करा.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Pigmentation : चेहऱ्यासाठी वापरा टोमॅटो, तांदुळाचं पीठ, जाणून घ्या पद्धत आणि फायदे
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On KDMC : कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटासोबत जाणार? मातोश्रीवरील बैठकीनंतर ठाकरे गटाने आपले पत्ते उघडले....
कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटासोबत जाणार? मातोश्रीवरील बैठकीनंतर ठाकरे गटाने आपले पत
  • कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग

  • शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली

  • ठाकरे गट कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

View All
advertisement