Daily Hacks : सकाळच्या घाईगडबडीत ऑइली केसं धुवायला विसरलात? नो टेंशन, वापरून पाहा 'हे' हॅक्स

Last Updated:

तूमची सकाळ 'बॅड हेअर डे' ने सुरू होते का? जेव्हा तुम्ही आरशात पाहता तेव्हा तुमचे केस चिकट, निर्जीव आणि अस्ताव्यस्त दिसतात आणि तुमच्याकडे ते धुण्यासाठी वेळ नसतो? जर हो, तर काळजी करू नका.

News18
News18
Daily Hair Hacks : तूमची सकाळ 'बॅड हेअर डे' ने सुरू होते का? जेव्हा तुम्ही आरशात पाहता तेव्हा तुमचे केस चिकट, निर्जीव आणि अस्ताव्यस्त दिसतात आणि तुमच्याकडे ते धुण्यासाठी वेळ नसतो? जर हो, तर काळजी करू नका, कारण आता तुम्हाला तुमच्या केसांच्या चिकटपणाबद्दल काळजी करण्याची गरज नाही. हो, आम्ही तुमच्यासाठी 5 आश्चर्यकारक हॅक्स घेऊन आलो आहोत जे काही मिनिटांत तुमच्या केसांना ड्राय आणि फ्रेश लुक देतील.
ड्राय शाम्पू ठरेल फायदेशीर
केसांचा चिकटपणा घालवण्यासाठी ड्राय शाम्पू हा सर्वात सोपा आणि जलद उपाय आहे. तो तुमच्या केसांच्या मुळांवर स्प्रे करा आणि बोटांनी हलक्या हाताने मसाज करा. ते जास्तीचे तेल शोषून घेते आणि व्हॉल्यूम वाढवते. स्प्रे केल्यानंतर, पावडर समान रीतीने वितरित होईल याची खात्री करण्यासाठी कंगव्याने केस विंचरून घ्या.
बेबी पावडर किंवा कॉर्नस्टार्च
जर तुमच्याकडे ड्राय शॅम्पू नसेल तर तुमच्या कॉस्मॅटिकसमध्ये बेबी पावडर किंवा किचनमधले कॉर्नस्टार्च देखील काम करू शकते. तुमच्या तळहातावर चिमूटभर पावडर घ्या आणि केसांच्या मुळांना हळूवारपणे लावा. 2-3 मिनिटांनी कंगव्याने नीट करा. हे तुमच्या केसांमधील तेल देखील शोषून घेते आणि त्यांना एक व्हॉल्युम देते आणि केस धुतल्यासारखा लूक देते. जास्त पावडर न लावण्याची काळजी घ्या, अन्यथा तुमचे केस राखाडी दिसू शकतात.
advertisement
तुमच्या हेअरस्टाईलने चिकटपणा लपवा
जर तुमचे केस खूप तेलकट वाटत असतील तर ते मोकळे सोडण्याऐवजी एक वेगळी हेअरस्टाईल वापरून पहा. तेलकट लूक लपवण्यासाठी उंच पोनीटेल, स्टायलिश बन किंवा ब्रेडेड हेअरस्टाईल योग्य आहेत. या स्टाईलमुळे तुमचे केस केवळ व्यवस्थित राहत नाहीत तर तुम्हाला एक स्टायलिश लूक देखील मिळतो.
ब्लो-ड्रायर वापरा
जर तुमचे केस थोडेसेच तेलकट असतील तर तुम्ही ब्लो-ड्रायर वापरू शकता. तुमचे केस थोडे थोडे वर करा आणि त्यातून थंड हवा ब्लो ड्राय करून घ्या. ही हवा केसांचे तेल कमी करण्यास मदत करेल आणि तुमच्या केसांना ताजे आणि जाड लूक देईल. जर तुमचे केस फक्त कपाळाभोवती तेलकट वाटत असतील तर हे हॅक विशेषतः उपयुक्त आहे.
advertisement
अॅक्सेसरीजसह तुमचा लूक बदला
स्टायलिश हेडबँड, स्कार्फ किंवा क्लिप वापरा. ​​हे केवळ चिकट केस लपवण्याचा एक उत्तम मार्ग नाही तर ते तुमचा एकूण लूक देखील बदलू शकते. तुम्ही तुमचे केस स्कार्फने झाकून एक स्टायलिश पगडी तयार करू शकता किंवा तुमच्या कपाळाजवळील केस झाकण्यासाठी हेडबँड वापरू शकता. या सोप्या टिप्सचा अवलंब करून, तुम्ही तुमचे केस सकाळच्या घाईत न धुताही ताजे आणि चमकदार बनवू शकता.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Daily Hacks : सकाळच्या घाईगडबडीत ऑइली केसं धुवायला विसरलात? नो टेंशन, वापरून पाहा 'हे' हॅक्स
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement