Pune : 12 वर्षाचा वाद अखेर मिटला! पुण्यात घटस्फोटापर्यंत गेलेल प्रकरण 18 वर्षांच्या लेकीमुळे थांबल; नेमके काय घडलं?

Last Updated:

Divorce Case : पुण्यात अनेक वर्षांचा वाद अखेर मिटला असून घटस्फोटापर्यंत गेलेले प्रकरण १८ वर्षांच्या लेकीमुळे थांबले आहे. नेमकं काय घडलं ते सविस्तर पाहा.

News18
News18
पुणे : वैचारिक मतभेदामुळे बारा वर्षांपासून सुरू असलेला पती-पत्नीचा वाद समुपदेशनाच्या माध्यमातून अखेर मिटवण्यात आला आहे. या निर्णयामागील मुख्य उद्देश म्हणजे काही महिन्यांत 18 वर्षे पूर्ण होणाऱ्या त्यांच्या मुलीच्या भविष्याचा विचार करणे. राकेश आणि स्मिता (दोघांची नावे बदलण्यात आली आहेत) या दाम्पत्याने अनेक वर्षे न्यायालयीन प्रक्रिया सुरू ठेवली होती, पण समुपदेशनाने दोघांचे मन एकत्र आणले.
नेमके घडले तरी काय?
2205 मध्ये विवाह झाल्यानंतर 2207 मध्ये या दाम्पत्याला एक मुलगी झाली. सुरुवातीला दोघांचे वैवाहिक जीवन सुरळीत चालले, राकेश आपल्या क्लासेसमध्ये व्यस्त होता तर स्मिता नोकरी करत होती.परंतू, मुलगी 5 ते ६ वर्षांची झाली तेव्हा दोघांमध्ये वैचारिक मतभेद स्पष्ट होऊ लागले. यानंतर 2013 मध्ये कोर्ट-कचेरी सुरू झाली आणि अनेक वर्षे ही लढाई चालू राहिली. पत्नीने पती, सासू आणि सासऱ्यांवर तक्रार केली की, त्यांनी तिच्यावर मानसिक दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, तर पतीने पत्नीने त्याच्याशी क्रूर वागणूक केली असल्याचा आधार घेऊन घटस्फोटासाठी अर्ज केला.
advertisement
या दीर्घकालीन वादामुळे मुलीच्या भविष्याची चिंता वाढली होती. दोन्ही पालकांसाठी मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे महत्त्वाचे होते की ते तटस्थ मार्गाने तडजोड करू शकतील. या पार्श्वभूमीवर, अॅड. सुचित मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली समुपदेशन सुरू झाले. समुपदेशनादरम्यान दोघांनी एकमेकांच्या मतांचा आदर करत आपापल्या अपेक्षा आणि भावनिक ताण मांडले. मुलीच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आणि तिच्या भविष्यासाठी योग्य निर्णय घेण्याचे दोघांनी ठरवले.
advertisement
समुपदेशनाचा परिणाम असा झाला की, दोन्ही पालकांनी एकमेकांविरोधात दाखल केलेले सहा दावे मागे घेतले. हे एक महत्त्वाचे पाऊल ठरले कारण यामुळे न्यायालयीन लढाई थांबली आणि मुलीच्या हितासाठी दोघांमध्ये संवादाची सुरुवात झाली. विशेष म्हणजे घटस्फोटाच्या प्रक्रियेमध्ये असूनही दोघे एकाच घरात राहत आहेत आणि काही महिन्यांपूर्वीही त्यांच्यात वाद सुरू होते.
या तडजोडीच्या निर्णयानंतर दाम्पत्याने दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेऊन एकत्रितपणे पूजा केली. गणपती दर्शनानंतर दोघे परत एकाच वाहनावरून परतले. या घटनेमुळे समाजात सकारात्मक संदेश गेल्याचे मानले जात आहे की, घटस्फोटाच्या प्रक्रियेतही समुपदेशनाद्वारे दोघे आपल्या मतभेदांना दूर करून मुलीच्या हितासाठी निर्णय घेऊ शकतात.
advertisement
समुपदेशनाच्या प्रक्रियेत दोघांनी व्यक्त केले की,मुलीच्या शिक्षण, करिअर आणि भावी जीवनासाठी त्यांनी वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवले. यामुळे मुलीला नकारात्मक वातावरणापासून संरक्षण मिळाले असून तिला स्थिर आणि सकारात्मक वातावरण मिळाले आहे. घटस्फोटाची प्रक्रिया असल्यामुळे समाजात अनेकदा पालकांच्या मतभेदांमुळे मुलांच्या भावी जीवनावर परिणाम होतो.पण, राकेश आणि स्मिताचे उदाहरण या संदर्भात प्रेरणादायी आहे.
advertisement
विशेष म्हणजे न्यायालयीन लढाईमध्ये राहूनही दोघांनी आपल्या भावनिक ताणावर नियंत्रण ठेवले. समुपदेशनादरम्यान त्यांना त्यांच्या व्यक्तिगत अपेक्षा आणि मुलीच्या भवितव्यासाठी गरजेच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे शिकवले गेले. परिणामी दोघांमध्ये विश्वासाची पुनर्बांधणी झाली आणि मुलीच्या हितासाठी निर्णय घेण्यात यश मिळाले.
मराठी बातम्या/पुणे/
Pune : 12 वर्षाचा वाद अखेर मिटला! पुण्यात घटस्फोटापर्यंत गेलेल प्रकरण 18 वर्षांच्या लेकीमुळे थांबल; नेमके काय घडलं?
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement