GST: दूध, तूप, बटर... 22 सप्टेंबरपासून कोणत्या वस्तू होणार स्वस्त? इथे चेक करा संपूर्ण लिस्ट

Last Updated:

GST चे नवे दर 22 सप्टेंबरपासून लागू होणार असून दूध, तूप, पनीर, साबण, टूथपेस्ट स्वस्त होतील. निर्मला सीतारमण यांनी दोन स्लॅब आणि लक्झरी वस्तूंवर 40 टक्के स्लॅब जाहीर केला.

जीएसटी रेट कट
जीएसटी रेट कट
GST चे नवे दर 22 सप्टेंबरपासून लागू होणार आहेत. इलेक्ट्रॉनिक्सपाठोपाठ जीवनावश्यक वस्तूंवरील GST देखील कमी करण्यात येणार आहे. त्याचा फायदा सर्वसामान्य लोकांना फायदा होणार आहे. खाण्या-पिण्याच्या गोष्टींवरील GST कमी होणार असल्याने आता हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये जाण्याचं प्रमाण देखील वाढणार आहे. याशिवाय घरातील जीवनावश्यक वस्तू स्वस्त होणार आहे. GST चे नवीन दर लागू झाल्यानंतर दूध, तूप, पनीर यासारख्या वस्तू स्वस्त होणार आहे.
नव्या दरांनुसार एक लिटर टेट्रा पॅक दुधावर 5 टक्के GST सह 77 रुपये दर होते. आता 75 रुपयांना दूध मिळणार आहे. तूप 750 रुपये होतं आता ते 720 रुपयांना मिळणार आहे. जे 200 ग्रॅम पनीर 95 रुपयांना मिळत होतं ते आता 92 रुपयांना मिळणार आहे. चीज स्लाइस 200 ग्रॅम जे 170 रुपयांना मिळणार होतं ते आता 160 रुपयांना नव्या दरांनुसार मिळणार आहे.
advertisement
रोजच्या वापरातील साबण, डिटर्जंट, टूथपेस्ट, केसांचे तेल 99 टक्के वस्तू 12 टक्के जीएसटी स्लॅबमधून 5 टक्के जीएसटी स्लॅबमध्ये हलवल्या जात आहेत. तुम्हाला माहिती आहे की जीएसटी कौन्सिलने जीएसटी प्रणालीतून 12 टक्के आणि 28 टक्के कर स्लॅब काढून टाकले आहेत. यापूर्वी, जीएसटी प्रणालीमध्ये एकूण 4 स्लॅब होते. 5 टक्के, 12 टक्के, 18 टक्के आणि 28 टक्के. 22 सप्टेंबरपासून, फक्त 2 स्लॅब 5 टक्के आणि 18 टक्के राहतील. याशिवाय, लक्झरी आणि सिन प्रोडक्ट्सवर 40 टक्के जीएसटीचा नवीन स्लॅब लागू केला जाईल अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली.
मराठी बातम्या/मनी/
GST: दूध, तूप, बटर... 22 सप्टेंबरपासून कोणत्या वस्तू होणार स्वस्त? इथे चेक करा संपूर्ण लिस्ट
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement