Adulteration in Tomato Ketchup: तुम्ही खात असलेल्या टोमॅटो सॉसमध्ये भेसळ तर नाही ना? सॉसमधली भेसळ घरीच ओळखण्याच्या ‘या’ सोप्या टिप्स्
- Published by:Tushar Shete
Last Updated:
Tips to identify adulteration in tomato sauce: टोमॅटो सॉसमध्ये सध्या भेसळ होण्याचं प्रमाण वाढलंय. जर तुमच्या खाण्यात असा भेसळयुक्त टोमॅटो सॉस आला तर तो तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो. टोमॅटो सॉसमधली भेसळ घरीच ओळखण्याच्या 5 सोप्या टिप्स.
मुंबई: सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे जंक फूड हा आपल्या आहाराचा एक अविभाज्य भाग बनलाय. फ्रँकी असो वा बर्गर, पिझ्झा असो वा सँडविच त्याबरोबर टोमॅटो सॉस हा आलाच. त्यामुळे गेल्या काही वर्षात टोमॅटो सॉसची मागणी वाढलीये. मात्र या वाढत्या मागणीसोबत वाढलंय ते टोमॅटो सॉसमध्ये भेसळ होण्याचं प्रमाण. जर तुमच्या खाण्यात सुद्धा असा भेसळयुक्त टोमॅटो सॉस आला तर तो तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे तुम्ही असलेला टोमॅटो सॉस हा शुद्ध आणि भेसळमुक्त असणं गरजेचं आहे आणि त्यासाठीच आम्ही तुम्हाला सांगतो आहोत, टोमॅटो सॉस मधली भेसळ ओळखण्याच्या 5 सोप्या टिप्स.
जाणून घेऊयात घरच्या घरीच टोमॅटो सॉस मधली भेसळ कशी ओळखायची ते
चव
तुम्ही खात असलेला टोमॅटो सॉस शुद्ध किंवा भेसळयुक्त आहे हे ओळखण्याची साधी सोपी चाचणी म्हणजे त्याची चव. खरा सॉस हा टोमॅटोंचा वापर करून बनवलेला असतो. त्यामुळे प्रत्येक टोमॅटोच्या वेगळ्या चवीनुसार सॉसची चव ही बदलून आंबट गोड लागू शकते. मात्र त्यात भेसळ असेल किंवा काही रसायनांचा वापर केलेला असेल त्या सॉसची चव ही थोडी कडक आणि वेगळी वाटू शकते.
advertisement
रंग
खरा आणि भेसळयुक्त टोमॅटो सॉस ओळखण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे त्यांचा रंग. टोमॅटोपासून बनवलेल्या सॉसचा रंग नेहमीच लाल दिसेल. मात्र जर त्यात भेसळ किंवा कृत्रिम रंग मिसळलेला असेल तर त्या एकदम वितित्र , भडक, किंवा एकदम फिका दिसेल. बनावट सॉसमध्ये गुठळ्या रंगाचे डाग दिसून येतात. कारण त्यात टोमॅटोऐवजी रासायनिक रंगांचा वापर केलेला असतो.
advertisement
पाण्याची चाचणी
पाण्याच्या मदतीने तुम्ही घरच्या घरी खरा आणि भेसळयुक्त टोमॅटो सॉस अगदी सहज ओळखू शकता. यासाठी एका ग्लासमध्ये पाणी घेऊन त्यात एक चमचा सॉस टाका. जर तो सॉस पाण्यात लवकर विरघळला किंवा सॉसमधला लाल मिसळू लागला तर समजून जा की सॉसमध्ये कृत्रिम रंगाची भेसळ केली गेलीये. असा सॉस खाणं आरोग्यासाठी धोकादायक आहे. सॉस पाण्यात टाकल्यानंतर बऱ्यात वेळानंतरही पाण्यात लाल रंग आला नाही तर समजा तुम्ही वापरत असलेला सॉस भेसळमुक्त आणि चांगल्या दर्जाचा आहे. कारण चांगल्या प्रतीचा टोमॅटो सॉस पाण्यात तरंगतो आणि त्याचा रंग बदलत
advertisement
घनतेवरून ओळख
जर तो सॉस खऱ्या टोमॅटोपासून बनवलेला असेल तर त्याची घनता ही जास्त असले. सोप्या भाषेत सांगायचं तर तो घट्ट किंवा जाड असेल मात्र त्यात चिकटपणा नसेल. मात्र त्या सॉसमध्ये रासायनिक रंग, आरोरोट किंवा कॉर्नफ्लॉवर किंवा स्टार्चची भेसळ असेल तर तो सॉस जास्त घट्ट आणि चिकट असू शकतो.
advertisement
आयोडीनचा वापर
तुम्ही खात असलेला टोमॅटो सॉस शुद्ध आहे की नाही हे अगदी काही क्षणात ओळखण्यसाठी आयोडिनचा वापर करता येईल. एका ताटलीत किंवा वाटीत सॉस घेऊन त्यात थोडं आयोडीन टाकून ते चांगलं मिसळून घ्या. जर सॉसचा लाल रंग बदलून निळा झाला तर त्यात आरारोट किंवा स्टार्चची भेसळ असल्याचं सिद्ध होईल. कारण कृत्रिमरित्या बनवलेला सॉस घट्ट करण्यासाठी आरारोटचा वापर केला जातो.
advertisement
घरीच बनवा टोमॅटो सॉस
तुमचं आरोग्य सुस्थितित राखण्यासाठी आणि टोमॅटो सॉसमधली भेसळ रोखण्यासाठी तुम्ही सॉस घरीच बनवण्याचा पर्याय निवडू शकता. टोमॅटो आणि काही मसाल्यांच्या प्रिझर्व्हेटिव्हजच्या वापराशिवाय टोमॅटो सॉस घरी बनवता येणं सहज शक्य आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 19, 2024 6:20 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Adulteration in Tomato Ketchup: तुम्ही खात असलेल्या टोमॅटो सॉसमध्ये भेसळ तर नाही ना? सॉसमधली भेसळ घरीच ओळखण्याच्या ‘या’ सोप्या टिप्स्