तीव्र सुगंधी परफ्यूमपासून सावधान! कनौजच्या व्यापाऱ्यांनी सांगितलं अस्सल अत्तर कसं ओळखायचं?

Last Updated:

असली आणि नकली परफ्यूम ओळखण्यात सर्वात महत्त्वाचा फरक त्याच्या सुगंधाने करता येतो.

News18
News18
अंजली शर्मा
कनौज: कुठेही जाताना हलकेच परफ्यूम मारला तर एकदम मूड छान होतो. अत्तराचा सुगंध मन प्रसन्न करतो आणि पॉझिटिव्ह वाइब्जसुद्धा. पण एखादा सुगंध उत्साहाने अंंगाला लावला किंवा फवारला आणि रॅश उठला तर? किंवा उग्र दर्पाने डोकं गरगरलं असंही झालं असेल. कारण हल्ली बाजारात बनावट परफ्यूमचा व्यवसायही बोकाळला आहे. अस्सल अत्तर आणि बनावट परफ्यूम ओळखणे थोडे अवघड होऊन बसते. भारतात अस्सल अत्तरांसाठी प्रसिद्ध जागा म्हणजे कन्नौज. इथल्या परफ्यूम व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, खरा परफ्यूम ओळखणे अवघड आहे पण अशक्य आहे.
advertisement
उत्तर प्रदेशातील कन्नौज येथील व्यापााऱ्यांशी बोलून Local18 ने अत्तरापासून परफ्यूम निर्मितीची प्रक्रिया समजून घेतली. वास्तविक परफ्यूम नेहमीच सुखद आणि हलका सुगंध देतो, तर तीव्र सुगंध असलेल्या परफ्यूममध्ये रसायने मिक्स केलेली असतात. काही परफ्यूम्स जीभेवर ठेवून किंवा शरीरावर वापरूनही चाचणी करता येते.
कन्नौजच्या परफ्यूम उद्योगात गुलाब, बेला, चंदन, मेहंदी, माती, केवडा, उद, केशर आणि शमामा हे सर्वात लोकप्रिय परफ्यूम आहेत. हे प्रमुख परफ्यूम विविध मिक्सर आणि कॉम्बिनेशनपासून बनवले जातात. कन्नौजचे परफ्यूम व्यापारी अशा गोष्टींपासूनही परफ्यूम काढतात, ज्यात सुगंध येण्याची किंचितही शक्यता नसते.
advertisement
असली आणि नकली परफ्यूम ओळखण्यात सर्वात महत्त्वाचा फरक त्याच्या सुगंधाने करता येतो. उच्च गुणवत्तेचा अस्सल परफ्यूम हलका आणि मधुर सुगंध देतो. त्याचबरोबर तीव्र आणि भपकेदार सुगंधी परफ्यूममध्ये रसायनांचा वापर केला जातो.
शुद्धता तपासण्यासाठी गुलाब आणि मातीसारखे परफ्यूम ही जिभेवर लावता येतात, तर काही परफ्यूम शरीरावर लावल्यानंतर त्यांची खरी ओळख देतात. खरे परफ्यूम महाग असल्याने ते सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असून स्प्रे किंवा डीओच्या स्वरूपातही बनवले जाते.
advertisement
परफ्यूम व्यापारी निशीष तिवारी यांनी 'लोकल १८'शी बोलताना सांगितले की, कन्नौज हे जगातील एकमेव असे ठिकाण आहे जिथे पारंपरिक पद्धतीने 'डेग-भभका ' पद्धतीने नैसर्गिक परफ्यूम तयार केले जातात. डेग भभका म्हणजे अत्तर तयार करण्याचे तांंब्याचे भांडे असते.
खरे आणि नकली परफ्यूम ओळखणे सोपे नसते आणि केवळ तज्च ते ओळखू शकतात. तिवारी म्हणाले की, वास्तविक परफ्यूमला तीव्र सुगंध नसतो, परंतु तो तीव्र सुगंध कृत्रिमरीतीने तयार करण्यात येतो. सुगंध अधिक काळ रेंगाळावा यासाठीही रसायनांचा वापर होतो. बाजारात विकले जाणारे अधिक सुगंधी परफ्यूम हे रसायनयुक्त असतात आणि अत्तराचा अर्क म्हणून विकले जातात. पण अस्सल  नैसर्गिक अत्तर खूप महाग असते. ज्यांची किंमत 30 हजार ते 40 हजार रुपये किलोपासून सुरू होऊन लाखांपर्यंत पोहोचते, जी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असते.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
तीव्र सुगंधी परफ्यूमपासून सावधान! कनौजच्या व्यापाऱ्यांनी सांगितलं अस्सल अत्तर कसं ओळखायचं?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement