लालबागचा राजा विसर्जन मिरवणूकीत चोरांचा सुळसुळाट, 100 पेक्षा जास्त फोन आणि गळ्याची चैन गायब, पोलीस स्टेशन बाहेर रांगा
- Published by:Devika Shinde
Last Updated:
मिळालेल्या माहितीनुसार, यंदा विसर्जन मिरवणुकीत 100 हून अधिक मोबाईल चोरीच्या तक्रारी पोलिसांकडे नोंदवण्यात आल्या.
मुंबई : मुंबईत गणेशोत्सव म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा पर्व. विशेषतः लालबागचा राजा ही गणेशप्रतिमा पाहण्यासाठी आणि विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी दरवर्षी लाखो भक्त मुंबईत जमा होतात. यंदाही विसर्जन सोहळ्याला प्रचंड गर्दी झाली, परंतु या गर्दीचा फायदा चोरट्यांनी घेतला.
मिळालेल्या माहितीनुसार, यंदा विसर्जन मिरवणुकीत 100 हून अधिक मोबाईल चोरीच्या तक्रारी पोलिसांकडे नोंदवण्यात आल्या. काळाचौकी पोलिस ठाण्याबाहेर पीडित भक्तांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आत्तापर्यंत 10 गुन्हे अधिकृतपणे दाखल झाले आहेत. त्यापैकी 4 मोबाईल पोलिसांनी परत मिळवले आहेत आणि 4 आरोपींना अटक केली आहे.
सोन्याच्या चेन चोरीचेही अनेक प्रकार
मोबाईल चोरीसोबतच सोन्याच्या चेन हिसकावण्याचेही प्रकार समोर आले आहेत. पोलिसांनी सांगितले की, सध्या 7 प्रकरणांची नोंद झाली असून, 2 सोन्याच्या चेन परत मिळाल्या आहेत आणि 12 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
advertisement
विसर्जन सोहळा 32-35 तासांचा
view commentsलालबागचा राजाची विसर्जन मिरवणूक लालबाग येथून सुरू होऊन गिरगाव चौपाटीपर्यंत सुमारे 32 ते 35 तास चालली. दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो भाविक बाप्पाला निरोप देण्यासाठी जमले होते, पण या गर्दीतच चोरट्यांनी हात साफ केला. मुंबई पोलिसांनी या घटनेत अधिक तपास सुरू केला असून, ड्रोन वापरासह नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरही कारवाई केली जात आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 09, 2025 10:36 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
लालबागचा राजा विसर्जन मिरवणूकीत चोरांचा सुळसुळाट, 100 पेक्षा जास्त फोन आणि गळ्याची चैन गायब, पोलीस स्टेशन बाहेर रांगा


