Difference between red & white Guava: लाल आणि पांढऱ्या पेरूंमध्ये नेमका फरक काय? चांगला, कीड न लागलेला पेरू न कापता ओळखायचा कसा ?

Last Updated:

Benefits of Guava in Marathi: पेरू हे जीवनसत्व क आणि फायबरचा समृद्ध स्रोत आहेत. यामुळे पचनक्रिया देखील सुधारते. रोगप्रतिकारक शक्ती वाढायला मदत होते. काही लोकं पेरूची चटणी, पेरूचं लोणंचंही बनवतात. तर काही लोक पेरू हा मीठ,मसाला लावून खातात.

प्रतिकात्मक फोटो : लाल आणि पांढऱ्या पेरूमध्ये नेमका फरक काय? चांगला पेरू न कापता ओळखायचा कसा ?
प्रतिकात्मक फोटो : लाल आणि पांढऱ्या पेरूमध्ये नेमका फरक काय? चांगला पेरू न कापता ओळखायचा कसा ?
मुंबई : देशातसह राज्यात हिवाळ्याला सुरूवात झालीये. राज्यात अनेक ठिकाणी पारा 15 अंशापर्यंत जावून पोहोचलाय. गुलाबी थंडीचा आनंद घेताना, जर तुम्हाला आजारी पडायचं नसेल तर रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी फळं तुम्हाला खायला हवीत. हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी, हमखास मिळणारी आणि सर्वसामान्यांच्या आवाक्यात असणारी फळं म्हणजे संत्री आणि पेरू .पेरू हे जीवनसत्व क  आणि फायबरचा समृद्ध स्रोत आहेत. यामुळे पचनक्रिया देखील सुधारते. रोगप्रतिकारक शक्ती वाढायला मदत होते. काही लोकं पेरूची चटणी, पेरूचं लोणंचंही बनवतात. तर काही लोक पेरू हा मीठ,मसाला लावून खातात.
बाहेरून दिसायला हिरवागार आणि आतून गोड अशी पेरूची ओळख. मुंबईसारख्या शहरांमध्ये आत्तापर्यंत आपण पांढरा आतून पांढरा असणारा पेरू सर्वसामान्यपणे विकला जात होता. मात्र आता लाल रंगाचा पेरूही बाजारात उपलब्ध आहे. लाल आणि पांढऱ्या पेरूत नेमका फरक काय ? दोन्हीपैकी आरोग्यासाठी चांगला पेरू कोणता ? आणि बाहेरून चांगला दिसणारा मात्र आतून किडकेला पेरू  न कापता ओळखायचा कसा याची माहिती आज जाणून घेऊयात.
advertisement

लाल आणि पांढऱ्या पेरूत फरक काय ? (Difference between Red & White Guava)

पेरूचा लाल रंग हा लाइकोपीन नावाच्या रंगद्रव्यामुळे होतो, जे एक प्रकारचं कॅरोटीनॉइड आहे. लाइकोपीन हे एक नैसर्गिक रंगद्रव्य आहे जे पेरूच्या साली आणि गरामध्ये आढळतो. त्यामुळे ज्या पेरूंमध्ये लाइकोपीन रंगद्रव्य जास्त असतं ते पेरू लाल असतात. ज्यात लाइकोपीन नसतं ते पेरू पांढरे असतात. लाइकोपीनमुळे पेरूच्या चवीत थोडा फरक दिसू शकतो. दोन्ही पेरूत पोषणतत्त्वे सारख्याच प्रमाणात असतात. त्यामुळे दोन्ही पेरू खाणं आरोग्यासाठी फायद्याचं आहे.
advertisement
Benefits of Guava in Marathi लाल आणि पांढऱ्या पेरूमध्ये नेमका फरक काय?

न कापता चांगला पेरू ओळखायचा कसा ? (How to identify best quality Guava Without cutting)

न कापता किंवा न खाता चांगला पेरू ओळखणं फार कठीण नाहीये. अनेकदा चांगले पेरू हे आतून किडलेले असतात. त्यामुळे बाजारातून चांगले दिसणारे पेरू घरी आणून कापल्यानंतर नाराज होण्यापेक्षा खरेदी करताना काही सोप्या टिप्स वापरल्या तर चांगला पेरू सहज ओळखता येतो.
advertisement

गुणवत्ता (Guava Quality)

पेरू खरेदी करण्यापूर्वी तो तळव्याने हळुवारपणे दाबून पाहा. जर पेरू दाबल्यावर खूप मऊ वाटत असेल तर तो खरेदी करण्याची चूक करू नका. पेरू हा एकदम कडक किंवा एकदम नरम नसावा. खूप कडक पेरू कच्चे असू शकतात, तर एकदम नरम पेरू आतून किडलेले असून शकतात. त्यात अळ्या किंवा किडे असण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
advertisement

सुगंध (Guava Smell)

ताज्या आणि गोड पेरूंचा एक चांगला सुगंध येत असतो.जर पेरू आतून किडलेले असतील किंवा आतून किडायला सुरूवात झाली असेल तर तसा चांगला सुगंध येणार नाही. आत असलेल्या किडे किंवा अळ्यांमुळे पेरूला घाण वास येऊ शकतो. त्यामुळे खरेदी करण्यापूर्वी पेरूचा वास घ्यायला विसरू नका.
advertisement

रंग आणि साल (Guava skin Color)

पेरू खरेदी करण्यापूर्वी त्याचा रंग आणि साल तपासून घ्या. जर पेरूची साल त्याच्या आकारानुसार गुळगुळीत, किंचित लवचिक आणि जाड असेल तर तो पेरू चांगला असेल. चांगले पिकलेले पेरू हे पिवळे तर मध्यम पिकलेले पेरू हे हिरवट पिवळे असतात. मात्र पूर्ण पिवळा, नरम पडलेला, चांगला वास न येणारा पेरू घेणं टाळा तो आतून खराब असू शकतो.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Difference between red & white Guava: लाल आणि पांढऱ्या पेरूंमध्ये नेमका फरक काय? चांगला, कीड न लागलेला पेरू न कापता ओळखायचा कसा ?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement