आयुष्याची गाडी रुळावर कशी ठेवाल? जाणून घ्या नातं मजबूत करणारे ५ 'सिक्रेट' मंत्र; अन्यथा घटस्फोटाची शक्यता

Last Updated:

तुम्ही कधी एक चाकाचं वाहन पाहिलं आहे का? समजा, ते पंक्चर झालं, तर लांबचा प्रवास करू शकेल का? तुम्ही म्हणाल, हा काय वेड्यासारखा प्रश्न आहे! याचं उत्तर तर...

Strengthen Relationship
Strengthen Relationship
तुम्ही कधी एक चाकाचं वाहन पाहिलं आहे का? समजा, ते पंक्चर झालं, तर लांबचा प्रवास करू शकेल का? तुम्ही म्हणाल, हा काय वेड्यासारखा प्रश्न आहे! याचं उत्तर तर लहान मूलही देईल. गाडी दोन चाकांवरच चालते.
पण, मग तुम्ही कधी विचार केला आहे की, तुमचं आयुष्य किती चाकांवर चालतं? होय, तुम्ही बरोबर वाचलंत. आपलं आयुष्यसुद्धा रस्त्यावर धावणाऱ्या वाहनासारखंच आहे. त्याचा वेग, गती आणि नियंत्रण हे पती-पत्नी मिळूनच ठरवतात. जेव्हा दोन लोक एका नात्यात येतात, तेव्हा ते नातं फक्त बाहेर फिरणं किंवा सोशल मीडियावर फोटो शेअर करण्यापुरतं मर्यादित नसतं. आयुष्याची गाडी जेव्हा खडबडीत रस्त्यांवरून धावायला लागते, तेव्हाच खऱ्या नात्याची परीक्षा सुरू होते.
advertisement
एकत्र राहा, पण एकत्र वाढा!
आकडेवारी धक्कादायक आहे. गेल्या दशकात भारतात घटस्फोटाचं प्रमाण ३० ते ४० टक्क्यांनी वाढलं आहे. विशेषतः शहरी भागातील २५ ते ३४ वयोगटात हे प्रमाण सर्वाधिक आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसारही, भारतातील घटस्फोटाचं प्रमाण जवळपास दुप्पट झालं आहे. तुमचं नातं या टप्प्यापर्यंत पोहोचू नये, यासाठी तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला परस्पर सामंजस्य विकसित करणं गरजेचं आहे.
advertisement
इथे एक गोष्ट समजून घ्यायला हवी: 'एकत्र राहणं' (Living Together) आणि 'एकत्र वाढणं' (Growing Together) या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. 'एकत्र राहणं' म्हणजे एकाच घरात राहणं, एकत्र खरेदीला जाणं, सुट्ट्यांमध्ये फिरायला जाणं. पण 'एकत्र वाढणं' म्हणजे काय? याचा अर्थ आहे...
  • एकमेकांची स्वप्नं समजून घेणं.
  • जोडीदाराला त्याचं स्वातंत्र्य (Freedom) देणं.
  • कठीण काळात एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून उभं राहणं.
  • आणि आयुष्य जेव्हा परीक्षा घेतं, तेव्हा प्रत्येक वळणावर एकमेकांचा हात घट्ट पकडून ठेवणं.
advertisement
आज नातं यशस्वी करण्यासाठी 'या' गोष्टी महत्त्वाच्या आहेत
१. नात्याची बदललेली व्याख्या: मनोचिकित्सक सोनाली गुप्ता स्पष्ट करतात की, आजकाल लोक प्रेमाकडे फक्त आनंदच नाही, तर 'संपूर्ण स्वातंत्र्याच्या' इच्छेतूनही पाहतात. उपचारांदरम्यान (थेरपी) याच समस्या प्रामुख्याने समोर येतात. त्या सांगतात, या समस्येच्या मुळाशी 'स्वातंत्र्य' आहे.
नातं टिकवण्यासाठी, या दोन टोकांमध्ये (प्रेम आणि स्वातंत्र्य) संतुलन राखणं गरजेचं आहे. कोणावर प्रेम करण्यासाठी, आपली स्वतःची ओळख (Identity) कायम ठेवून, जोडीदाराच्या गरजांसाठीही जागा निर्माण करता आली पाहिजे. आपण स्वतःसाठी निर्णयाचं स्वातंत्र्य मागतो, तेव्हा आपण आपल्या जोडीदारालाही तोच अधिकार दिला पाहिजे.
advertisement
२. तंत्रज्ञानाचा परिणाम: डेटिंग ॲप्समुळे जोडीदार शोधण्याच्या पद्धती बदलल्या. पण त्याचबरोबर, गॅझेट्सवरचं आपलं अवलंबित्वही वाढलं. आपण प्रत्येक गोष्टीसाठी सोशल मीडिया, तंत्रज्ञान आणि AI चा वापर करत आहोत. यामुळे नात्यात एकमेकांसाठी 'वेळेची कमतरता' निर्माण झाली आहे. परिणामी, नाती अधिक गुंतागुंतीची होत आहेत.
आज नात्यांना यशस्वी करण्यासाठी सहजता (Spontaneity), लवचिकता (Flexibility) आणि एकमेकांना त्यांची 'स्पेस' देणं (Giving Space) खूप आवश्यक आहे.
advertisement
तुमचं नातं मजबूत करणारे ५ मंत्र
१. मोकळेपणाने बोला (Talk Openly): नात्याची सुरुवात संवादाने होते, पण कालांतराने तो फक्त 'गरजांपुरता' उरतो. असं होऊ देऊ नका. फक्त घरातील वस्तू किंवा मुलांच्याबद्दल बोलू नका; तर तुमच्या मनातील भीतीबद्दल (Fears), तुमच्या स्वप्नांमधील आनंदाबद्दल (Joys) बोला. जेव्हा जोडपी मोकळेपणाने बोलतात, तेव्हा एक असं वातावरण तयार होतं, जिथे कोणताही पूर्वग्रह (Judgment) किंवा भीती नसते. कोणी मोठं नाही, कोणाचं स्वप्न लहान नाही. याच वातावरणात नातं खरं 'श्वास' घेतं आणि वाढतं. तुमच्या व्यस्त वेळापत्रकातून फक्त एकमेकांशी बोलण्यासाठी वेळ काढा; असा वेळ जिथे फोन किंवा इतर कोणताही अडथळा नसेल.
advertisement
२. एकमेकांच्या स्वप्नांचा भाग व्हा (Be a part of each other's dreams): बऱ्याचदा नात्यात आपण एकत्र चालायला सुरुवात करतो, पण हळूहळू एकजण मागे पडतो. आपण आपल्या करिअरला प्राधान्य देतो, पण जोडीदाराचा व्यवसाय किंवा त्याची आवड (Passion) समजून घेत नाही; किंवा त्याला कमी लेखतो. असं करू नका. जर तुमचा जोडीदार फोटोग्राफर असेल, तर कधीतरी त्याच्यासोबत शूटला जा. जर जोडीदाराचा व्यवसाय असेल, तर त्याचा ताण आणि ध्येयं समजून घ्या. डॉ. उन्नती यांच्या मते, कधीतरी जोडीदाराला विचारा, "या आठवड्यात तुझं सर्वात मोठं ध्येय काय आहे आणि मी त्यात कशी मदत करू शकते?" तुमचे हे प्रयत्न जोडीदारामध्ये सकारात्मकता वाढवतील.
३. बदलांना स्वीकारा (Accept the Changes): अनेकदा लोक तक्रार करतात, "तो आधी असा नव्हता," किंवा "तू खूप बदललीस." पण एक सांगा, वेळ, परिस्थिती, जबाबदाऱ्या... सगळंच बदलतं. मग तुम्ही किंवा तुमचा जोडीदार कसा बदलणार नाही? माणूस हा वेळ, अनुभव आणि वयानुसार बदलतोच. जी जोडपी हा बदल सहज स्वीकारतात, तीच पुढे जाऊ शकतात. यासाठी जुन्या आठवणींना उजाळा द्या. काही महिन्यांतून एकदा एकत्र बसा, जुने फोटो पाहा आणि बोला की, "आपण कुठून सुरुवात केली होती आणि आज कुठे पोहोचलो आहोत." यामुळे 'आपण दोघेही एकत्र बदलत आहोत आणि हा बदल चांगला आहे,' ही भावना टिकून राहते.
४. राग आणि अहंकार सोडून द्या (Repent from anger and pride): "तू माझा फोन का उचलला नाहीस?", "तू माझं ऐकलंच नाहीस?"... हे प्रश्नोत्तर प्रत्येक घरात सुरू असतात. भांडी आहेत, तर ती वाजणारच. पण छोट्या गोष्टींवरून वाद घालून नातं खराब करणं योग्य आहे की, दुसऱ्याचा दृष्टिकोन समजून घेऊन आपला अहंकार (Ego) बाजूला ठेवून पुढे जाणं, हे तुम्हाला ठरवायचं आहे. वाद जिंकण्यापेक्षा, 'नातं जिंकणं' महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. जेव्हा वाद होईल, तेव्हा एकाने शांतपणे दुसऱ्याचं ऐकून घ्या. मध्येच बोलू नका. आणि दिवसाचा शेवट कोणतीही तक्रार मनात न ठेवता करा.
५. स्वतःलाही 'स्पेस' द्या (Give yourself space too): लक्षात ठेवा, नात्यात 'सोबतीची' गरज आहे, पण प्रत्येक वेळी चिकटून राहणं (Clinginess) एका निरोगी नात्यासाठी चांगलं नाही. प्रत्येकाला स्वतःच्या 'स्पेस'ची (Me Time) गरज असते. त्या वेळेचा उपयोग ते वाचन, मित्रांना भेटणं किंवा स्वतःचा छंद जोपासण्यासाठी करू शकतात. आठवड्यातून काही तास फक्त 'स्वतःसाठी' राखून ठेवा. यामुळे नात्यात ताजेपणा टिकून राहतो.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
आयुष्याची गाडी रुळावर कशी ठेवाल? जाणून घ्या नातं मजबूत करणारे ५ 'सिक्रेट' मंत्र; अन्यथा घटस्फोटाची शक्यता
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement