स्वर्गापेक्षा कमी नाही! भारतातली ही ५ 'ऑफबीट' ठिकाणं पाहून तुम्ही व्हाल थक्क; गर्दी विसरा, शांततेत जगा!
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
पर्यटनाचा खरा उद्देश फक्त फिरणं नाही, तर लोकांना जग पाहण्यासाठी, वेगवेगळ्या संस्कृती समजून घेण्यासाठी आणि माणसा-माणसांतील संवाद वाढवण्यासाठी प्रोत्साहन देणं हा आहे. प्रत्येक देशाची...
पर्यटनाचा खरा उद्देश फक्त फिरणं नाही, तर लोकांना जग पाहण्यासाठी, वेगवेगळ्या संस्कृती समजून घेण्यासाठी आणि माणसा-माणसांतील संवाद वाढवण्यासाठी प्रोत्साहन देणं हा आहे. प्रत्येक देशाची, तिथल्या माणसांची एक वेगळी संस्कृती, समृद्ध वारसा, निराळी बोलीभाषा, खाणंपिणं आणि पेहराव असतो. हे सगळं जवळून पाहण्याची आणि अनुभवण्याची संधी आपल्याला पर्यटनामुळेच मिळते. याच उद्देशाने पर्यटन दिनाची स्थापना करण्यात आली.
भारत तर विविधतेने नटलेला देश आहे आणि पर्यटन हा इथला एक मोठा व्यवसाय आहे. भारतीयांना डोंगरदऱ्या आणि समुद्रकिनारे यांचं प्रचंड आकर्षण. त्यामुळे दरवर्षी लाखो लोक शिमला, मनालीसारख्या प्रसिद्ध ठिकाणी गर्दी करतात. पण, या गर्दीच्या ठिकाणांपलीकडेही अशी काही स्थळं आहेत, जिथे फारशी गर्दी नसते, पण तिथलं नैसर्गिक सौंदर्य मात्र अतुलनीय असतं. जर तुम्ही खऱ्या अर्थाने प्रवासप्रेमी असाल, तर या पाच ठिकाणांना एकदा तरी नक्की भेट द्या. ही ठिकाणं एखाद्या स्वर्गापेक्षा कमी नाहीत!
advertisement
शांतता आणि सौंदर्याने भरलेली ५ पर्यटन स्थळे
१. चक्राता (Chakrata): तुम्हाला जर डोंगरभटकंतीची आवड असेल, तर चक्राता तुमच्यासाठीच आहे. डेहराडूनपासून अवघ्या ८९ किमी (अडीच-तीन तास) अंतरावर असलेलं हे ठिकाण म्हणजे निसर्गाचा एक अद्भुत नमुना आहे. घनदाट पाईनची जंगलं, हिरवळ आणि इथला प्रसिद्ध 'टायगर फॉल्स' तुमचं मन मोहून टाकेल. तुम्ही जर निसर्गप्रेमी असाल, तर चक्राताला भेट देण्याची संधी सोडू नका.
advertisement
२. मावलिनोंग (Mawlynnong): प्रवासवेड्या माणसाने मेघालयमधील 'आशियातील सर्वात स्वच्छ गावाला' भेट द्यायलाच हवी. मावलिनोंगला 'देवाचं स्वतःचं उद्यान' म्हणूनच ओळखलं जातं. इथला प्रत्येक नागरिक स्वच्छतेबाबत इतका जागरूक आहे, की रस्त्यावर कचरा दिसल्यास ते स्वतः उचलून कचराकुंडीत टाकतात. हे गाव शिलॉंग आणि चेरापुंजीशी रस्त्याने उत्तमप्रकारे जोडलेलं आहे. गुवाहाटी हे सर्वात जवळचं रेल्वे स्टेशन (१७२ किमी) आणि शिलॉंग विमानतळ (७८ किमी) आहे. दोन्ही ठिकाणांहून बस आणि टॅक्सी सहज उपलब्ध होतात.
advertisement
३. जवाई (Jawai): राजस्थानची आवड असणाऱ्यांसाठी जवाई हे एक 'दडलेलं रत्न' आहे. ही एक खास 'लेपर्ड सफारी' आहे, जिथे तुम्ही बिबट्यांना आणि इतर अनेक वन्य प्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पाहू शकता. नदीकाठच्या ग्रॅनाईटच्या टेकड्या आणि तिथली स्थानिक संस्कृती अनुभवून तुमची सहल अविस्मरणीय होईल. इथपर्यंत पोहोचण्यासाठी उदयपूर विमानतळ (१५० किमी) किंवा फालना (Falna) रेल्वे स्टेशन (५० किमी) गाठता येतं. तिथून पुढे स्थानिक बस आणि टॅक्सी सहज मिळतात.
advertisement
४. लोणार विवर सरोवर (Lonar Crater Lake): ज्यांना इतिहास आणि भूगोल या दोन्हीची आवड आहे, त्यांनी महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील या अद्भुत सरोवराला नक्की भेट द्यावी. सुमारे १.८ किमी रुंद आणि १५० मीटर खोल असलेलं हे सरोवर म्हणजे पृथ्वीवरचा एक जिवंत इतिहास आहे. असं म्हटलं जातं की, सुमारे ५२,००० वर्षांपूर्वी एक महाकाय उल्का पृथ्वीवर आदळल्याने हे विवर (Crater) तयार झालं. हेच ते 'लोणार विवर'.
advertisement
५. सापुतारा (Saputara): सापुतारा हे गुजरात राज्यातील एकमेव थंड हवेचं ठिकाण आहे. इथल्या आल्हाददायक हवामानाचा आनंद घेण्यासाठी लोक खास करून उन्हाळ्यात इथे येतात. सुंदर डोंगरदऱ्यांशिवाय इथे एक ऐतिहासिक किल्ला देखील आहे. 'हातगड किल्ला' नावाचा हा किल्ला महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर अभिमानाने उभा आहे.
advertisement
हे ही वाचा : 'ब्युटी पार्लर स्ट्रोक सिंड्रोम'! सलूनमध्ये हेअर वॉशमुळे स्ट्रोक येऊ शकतो? तज्ज्ञांनी दिले गंभीर इशारे
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 21, 2025 10:28 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
स्वर्गापेक्षा कमी नाही! भारतातली ही ५ 'ऑफबीट' ठिकाणं पाहून तुम्ही व्हाल थक्क; गर्दी विसरा, शांततेत जगा!