जुनी साडी टाकून देताय? अशी बनवा सुंदर पायपुसनी
- Published by:News18 Marathi
Last Updated:
तुम्हीदेखील घरातील जुन्या साड्यांचा पुनर्वापर करू शकता.
वर्धा, 21 डिसेंबर: अनेक गृहिणी घरात टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवत असतात. बऱ्याचदा घरात जुन्या झालेल्या साड्या टाकून दिल्या जातात. पण या साड्यांपासून अगदी सोप्या पद्धतीनं सुंदर पायपुसनी किंवा पायदान बनवता येऊ शकते. वर्धा येथील गृहिणी शोभाताई मकेश्वर आणि सीमाताई आतकरे यांनी हे पायदान कसं बनवायचं याबाबत माहिती दिली आहे.
कसं बनवायचं साडीचं पायदान?
सर्वप्रथम जुनी साडी घेऊन लांब पट्ट्या फाडून घ्यायच्या आहेत. त्याचा गोळा बनवून ठेवायचा. आता पायदान बनविण्यासाठी खिळे ठोकलेली पाटी घेऊन (ही पाटी वाडकाम करण्याऱ्यांकडून बनवून घेतली आहे) या पाटीवर कोपऱ्यातल्या एका खिळ्यापासून सुरवात करायची आहे. त्या खिळ्याला गाठ पाडून समांतर विरुद्ध दिशेच्या खिळ्याला अडकवून पूर्ण पाटी कव्हर करायची आहे.
advertisement
उभ्या आणि आडव्या अशा पद्धतीने पूर्ण साडीच्या पट्ट्या पाटीवर अडकवून घ्यायची आहे. शेवटी गाठ मारून घ्यायची आहे. आता साडीवर मॅच होणारा आवडत्या रंगाची लोकर घेऊन बॉल पिन मध्ये अडकवून प्रत्येक चौकोनावर नॉट टाकून घ्यायचे आहेत. शेवटी कात्री किंवा धारदार वस्तूने काठ कापून घ्यायचे आहेत. आता तुमच्या जुन्या साडीपासून आसन किंवा पायदान बनवून तयार आहे.
advertisement
टाकाऊपासून टिकाऊ
महिला म्हटलं की काटकसर आलीच. काहीतरी वेगळं करण्याच्या कल्पना महिलांना सुचत असतात. अशाप्रकारे वर्ध्यातील सीमाताई अतकरे आणि शोभाताई मकेश्वर यांनी जुन्या साड्यांपासून पायदान किंवा आसन तयार करण्याची भन्नाट कल्पना आपल्यासोबत शेयर केली आहे. तर तुम्हीदेखील अशाचप्रकारे जुन्या साड्यांचा पुनर्वापर करू शकता.
Location :
Wardha,Maharashtra
First Published :
December 21, 2023 10:01 AM IST