How to Make Shengdana Puran Poli : शेंगदाणा पुरणपोळी कशी बनवायची? रेसिपी अगदी सोपी
- Published by:Devika Shinde
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
ज्यांना चनाडाळची पुरणपोळी आवडत नाही त्यांच्यासाठी तुम्ही शेंगदाण्याची पुरणपोळी बनवू शकता. रेसिपी अगदी सोपी आहे.
प्रगती बहुरुपी- प्रतिनिधी, अमरावती : पुरणपोळी म्हटलं की, सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं! लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच पुरणाची पोळी खायला आवडते. प्रत्येक महाराष्ट्रीय घरात हा पदार्थ बनतोच बनतो. होळीच्या मुहुर्तावर या पदार्थाला बहुतांश घरात बनवलं जातं, पण असं असलं तरी देखील इतर सणांना ही आवडीने पूरणपोळी बनवली जाते आणि खाल्ली ही जाते. गरम गरम तुपासोबत पूरण पोळी खाण्याची मजात वेगळी आहे. पण, काही जणांना चनाडाळीची पुरणपोळी आवडत नाही. अशांसाठी एक भन्नाट पर्याय आहे – शेंगदाणा पुरणपोळी. ही पुरणपोळी चवीला तर जबरदस्त लागतेच, पण बनवायलाही खूप सोपी आहे. चला, जाणून घेऊया शेंगदाणा पुरणपोळी कशी बनवतात.
साहित्य:
शेंगदाण्याचे कूट
वेलची पूड
तूप/तेल
साखर
ड्रायफ्रूट
गव्हाचे पीठ
कृती:
१. सर्वप्रथम शेंगदाणे, साखर, ड्रायफ्रूट आणि वेलची एकत्र करून मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या.
२. गव्हाचे पीठ मळून घ्या. त्यात थोडं तेल आणि मीठ घालून मस्त मळा. यामुळे पोळी खुसखुशीत होईल.
३. आता पीठ लाटून त्यात तयार केलेलं शेंगदाण्याचं पुरण भरायचं. पुरण नीट पसरून, उरलेलं पीठ दाबून बंद करायचं.
advertisement
४. त्यानंतर पोळी हलक्या हाताने लाटून घ्यायची.
५. पोळी तव्यावर टाकण्यापूर्वी तव्यावर तूप किंवा तेल लावायचं, यामुळे पोळी मऊ राहील आणि चिकटणार नाही.
६. दोन्ही बाजूंनी छान शिजवून घ्या, आणि बस्स, तुमची शेंगदाणा पुरणपोळी तयार!
ही पुरणपोळी अगदी घरात असलेल्या साहित्यापासून बनवता येते. चवीला मस्त लागणारी ही पोळी तुम्ही दही, दूध किंवा आमरसासोबत खाऊ शकता. साखर तुमच्या आवडीनुसार कमी-जास्त करू शकता, पण हे तेवढंच खरं आहे की ही पोळी कोणाही अगदी आवडीने खाईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 22, 2024 6:10 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
How to Make Shengdana Puran Poli : शेंगदाणा पुरणपोळी कशी बनवायची? रेसिपी अगदी सोपी